
वार्ताहर-स्वप्नील गाडे
मुंबईत शुक्रवारी शहरातील पाच पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.तेजस्विनी सातपुते यांची पुणे तर राजतीलक रोशन यांच्यांकडे राज्याच्या कायदा वसुव्यवस्था सहाय्यक पोलीस महानिरीक्षक पदाची जबाबदारी हाती दिली आहे.
सुरक्षा विभागाचे पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांची परिमंडळ पाच,परिमंडळ आठचे पोलीस उपायुक्त दीक्षित कुमार गेडाम यांची परीमंडळ नऊ,संरक्षण विभागाचे पोलीस उपायुक्त मनीष कालसानिया यांची परिमंडळ आठ मध्ये बदली करण्यात आली आहे.
शुक्रवारी मुंबई शहरातील पाच पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या त्याचे आदेश जारी करण्यात आलेत.संरक्षण व सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पो.निरीक्षक राजीव शेजवळ यांची वडाळा पोलीस ठाणे,गुन्हे शाखेचे साहाय्यक पो.आयुक्त शैलेश पासलवार यांची घाटकोपर विभागात,लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महेश बळवंतराव यांची एमएचबी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे