छत्रपती संभाजी नगर मध्ये एका मराठा तरुणाने आत्महत्या केलीय. समाजाला सरसकट आरक्षण देत नाही. यामुळे मी आत्महत्या करत आहे. अशी चिठ्ठी त्याने लिहून ठेवली आहे. दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. भक्ती नगर पिसादेवी परिसर येथे ही घटना घडली. श्री गणेश भिकनराव शिंदे (वय वर्ष ४० रा भक्ती नगर, परिसर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मात्र मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटलांसाठी हा मोठा धक्का आहे कारण, त्यांनी कोणीही आत्महत्या करू नका, असे आवाहन केले आहे.