
पत्रकार :उमेश गायगवळे
कोणतेही परवानगी नसताना अवैधरित्या बांगलादेश मार्गे भारतात घुसून तिथून मुंबई प्रवेश करून अवैधरीत्या राहणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना वडाळा पोलिसांनी अटक केली आहे.
बांगलादेश सीमारेषेवरून अवैधरित्या भारतात घुसखोरी करून तिथून थेट मुंबई त येऊन गोंवडी परीसरात राहणाऱ्या बांगलादेशी कलाम मोहम्मद अजीज शेख ४६ याला वडाळा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे त्याला मदत करणारा दुसरा आरोपी सैदुल सुपर शेख राहणार गौतम नगर गोवंडी यालाही अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश दिवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश जाधव, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर ढाणे अँटॉफिल पोलीस ठाणे, वडाळा टी टी टर्मिनल ऐकून पोलीस ठाण्याचे दहशत विरोधी पथक, अँटॉप हिल पोलीस ठाण्याचे दहशत विरोधी पथक यांनी कारवाई करून आरोपींना अटक केली.