मुंबई प्रतिनिधी
एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईज युनियन (AAEU) तर्फे संघटनेच्या पारदर्शक कार्यपद्धती, कर्मचारीहित आणि सशक्त समन्वयाच्या तत्त्वांना चालना देत Sky High कंपनीसोबतचा COD करार आज अधिकृतरित्या स्वाक्षरीत झाला. युनियनच्या अधिकारकेंद्री आणि कर्मचारीकल्याणाशी निगडित उपक्रमांमध्ये हा करार महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
Sky High कंपनीचे डायरेक्टर साहिल मेहता, श्रीमती प्रेमा आणि त्यांची टीम यांच्या झालेल्या या करार कार्यक्रमाला AAEU तर्फे मोहम्मद सरवर, जनरल सेक्रेटरी कुणाल सरमळकर आणि उपाध्यक्ष संजू शाह यावेळी उपस्थित होते. याशिवाय Sky High कमिटीच्या रिंकू, अनीस, रवी, संजय शिंदे, सुनील शिंदे, सुनील आर्या, किरण गायकवाड, शंकर सूर्यवंशी, परिचय तेगुरे आणि अग्नेलो फर्नांडिस या कर्मचाऱ्यांनीही सहभाग नोंदवला.
करारातील प्रमुख अटी :
• COD वैधता: मार्च 2027 पर्यंत
• वेतन: 5,800 + महागाई भत्ता (DA)
• मेडिक्लेम कव्हर: 5 लाख
• ग्रुप टर्म इन्शुरन्स: मृत्यू प्रसंगी 10 लाख अपघात विमा कव्हर
या करारामुळे कंपनी–युनियनमधील परस्पर विश्वास वृद्धिंगत होण्यासोबतच कामकाजातील सुसंगतता, शिस्तबद्धता आणि परिणामकारकता वाढण्यास मदत होईल, असा युनियनचा विश्वास आहे. कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांच्यासाठीच्या सुविधा आणि सुरक्षिततेविषयीचा युनियनचा कटिबद्ध दृष्टिकोन पुन्हा अधोरेखित झाला आहे.
AAEU परिवाराच्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल आणि संघटनेवरील विश्वासाबद्दल पदाधिकाऱ्यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.


