
मुंबई प्रतिनिधी
मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती. मध्य रेल्वेवर रविवारी (१९ ऑक्टोबर) देखभाल आणि अभियांत्रिकी कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार असून काही गाड्या वळविण्यात येतील.
•ब्लॉक विभाग आणि वेळ
विद्याविहार ते ठाणे दरम्यान ५वा आणि ६वा मार्ग या विभागावर सकाळी ८.०० ते दुपारी १.३० पर्यंत ब्लॉक राहणार आहे.
या कालावधीत या मार्गावर अभियांत्रिकी तसेच सिग्नल व इतर तांत्रिक कामे केली जाणार आहेत. त्यामुळे काही मेल-एक्सप्रेस गाड्यांना वळविण्यात येणार असून त्या गाड्या साधारणतः १० ते १५ मिनिटे उशिराने धावतील.
•अप मेल/एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्जन
या गाड्या ठाणे येथे अप जलद मार्गावर वळवून विद्याविहार येथे पुन्हा त्यांच्या मूळ मार्गावर आणल्या जातील.
11010 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिहागड एक्सप्रेस
12124 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन
13201 पाटणा – लोकमान्य तिळक टर्मिनस एक्सप्रेस
17221 काकीनाडा – लोकमान्य तिळक टर्मिनस एक्सप्रेस
12126 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस
12140 नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सेवाग्राम एक्सप्रेस
22226 सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस
12168 बनारस – लोकमान्य तिळक टर्मिनस एक्सप्रेस
12321 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
12812 हाटिया – लोकमान्य तिळक टर्मिनस एक्सप्रेस
11012 धुळे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
•डाउन मेल/एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्जन
11055 लोकमान्य तिळक टर्मिनस – गोरखपूर गोडान एक्सप्रेस
11061 लोकमान्य तिळक टर्मिनस – जयनगर एक्सप्रेस
16345 लोकमान्य तिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस
17222 लोकमान्य तिळक टर्मिनस – काकीनाडा पोर्ट एक्सप्रेस
• हार्बर मार्गावरही ब्लॉक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/बांद्रा डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० आणि
चुनाभट्टी/बांद्रा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर ११.१० ते १६.१० पर्यंत ब्लॉक राहणार आहे.
या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या गाड्या तसेच बांद्रा आणि गोरेगावकडे जाणाऱ्या काही सेवा रद्द राहतील.
• पर्यायी व्यवस्था
ब्लॉकदरम्यान पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष गाड्या दर २० मिनिटांच्या अंतराने चालविण्यात येतील.
तसेच सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, रविवारी प्रवासापूर्वी वेळापत्रक आणि गाड्यांची माहिती तपासूनच प्रवास करावा, जेणेकरून अनावश्यक अडचणी टाळता येतील.