
मुंबई प्रतिनिधी
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार पक्षाच्या उत्तर मध्य मुंबई जिल्हा अध्यक्षपदी मा. अमित तांबे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच जिल्हा सरचिटणीसपदी मा. गौतम जाधव यांची निवड झाली आहे.
या निवडीबद्दल रिपाइंच्या कार्यकर्त्यांकडून दोन्ही पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य उमाजी सपकाळे तसेच रिपाइं (आठवले) सोशल मीडिया मुंबई अध्यक्ष उमाजी सपकाळे यांनी नव्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
या निवडीमुळे उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यात पक्ष संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.