
पत्रकार :उमेश गायगवळे
आझाद मैदान पोलीस ठाण्यांतर्गत एका पानपट्टी वाल्याला धमकावून आम्ही क्राइम ब्रँच चे पोलीस अधिकारी असून पानटपरी चे लायसन्स आहे का? असे विचारणा करून सदरच्या पानवाल्याला दुकानदाराला टॅक्सीत बसून क्राईम ब्रँच ऑफिसला घेऊन जात आहोत. असे धमकावून भायखळा येथे आणून त्याच्याकडून ८४०० रुपये उकळणाऱ्या आरोपी उत्तम केशव मोरे वय५३ याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून दहिसर, माटुंगा, आझाद मैदान पोलीस ठाणे, अशा अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई परिमंडळ 1 चे पोलीस उपआयुक्त डॉ प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलिमा कुलकर्णी, पो .निरीक्षक पडवळ यांच्या स पो नी लीलाधर पाटील पोलीस उपनिरीक्षक अरुण गायकवाड यांनी केली.