
मुंबई:प्रतिनिधी
मुंबई: जालना जिल्ह्यातील असणारे धडाडीचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे कार्यकर्ते तथा दैनिक लोकनायकचे पत्रकार संजय बोर्डे यांचे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी रात्री दहा वाजता कांदिवलीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या दुःखद निधनाने कांदिवली पूर्व विभागात तसेच त्यांचा मित्र परिवारामध्येव हळहळ व्यक्त केली जात आहे. सर्वसामान्यांसाठी धावून जाणारे व नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी वेळोवेळी तप्तर असणारे संजय बोर्डे हे सर्व परिचित होते. त्यामुळे स्थानिक पोलीस आणि शासकीय अधिकाऱ्यांची नेहमीच त्यांचे खडके उडालेले होते. मात्र गोरगरीब नागरिकांच्या पाठीशी उभे असणारे बोर्डे अल्पावधीतच गेल्याने सर्वत्र तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणारे बोर्डे हे सर्वांचे परिचित होते.