
मुंबई प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘सेवापंधरवडा’ उपक्रमाचा भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून “नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान” अंतर्गत भव्य आरोग्य व नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर रविवारी २८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अंबिका मित्र मंडळ, लाल मैदान, धोबीघाट, पाईपलाईन, खार-पूर्व, मुंबई – ५१ येथे होणार आहे. सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
शिबिरात नागरिकांसाठी विविध तपासण्या मोफत करण्यात येणार असून, त्यात नेत्र तपासणी, सामान्य आरोग्य तपासणी, रक्तदाब तपासणी, रक्तातील साखरेची तपासणी तसेच ईसीजी चाचणी यांचा समावेश आहे. आपण सर्वांनी स्वतःसह आपल्या परिवाराची तपासणी करून घ्यावी आणि निरोगी राहावे,” असे आयोजकांनी नमूद केले.
या उपक्रमासाठी रुपेश मनोहर मालुसरे, जिल्हा सचिव लोकेश डेव्ह कार्यकारिणी सदस्य, रश्मी रुपेश मालुसरे कार्यकारिणी सदस्य, नावनाथ दिघे वॉर्ड अध्यक्ष-९४,आणि शैलेश पाटील सांताक्रूझ-खार पूर्व मंडळ अध्यक्ष यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
विशेष आभार अंबिका मित्र मंडळ यांनी मानले आहेत.