
मुंबई प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, उत्तर मध्य मुंबई जिल्हा तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हिंदू असोसिएशन, कदमवाडी, सांताक्रूझ (पूर्व) येथे भरविण्यात आलेल्या या शिबिराला सकाळपासूनच कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा आणि रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिराचे उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनावेळी बोलताना शेलार म्हणाले, “पंतप्रधान मोदीजींच्या कार्याचा खरा सन्मान करायचा असेल, तर समाजासाठी काहीतरी देणगी द्यावी लागते. रक्तदान हेच सर्वात मोठं दान आहे आणि आज या शिबिरातून कार्यकर्त्यांनी मोदीजींविषयी असलेले प्रेम व कृतज्ञता दाखवली आहे.”
या प्रसंगी आमदार पराग अळवणी, मुंबई उपाध्यक्ष सुहास आडिवरेकर, महेश पारकर, जिल्हाध्यक्ष विरेंद्र म्हात्रे, उपाध्यक्ष राजेश दाभोळकर, सचिव रुपेश मालूसरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी रक्तदात्यांचे अभिनंदन केले आणि अशा उपक्रमांमुळे समाजात ऐक्य व मानवतेचा संदेश पोहोचतो असे सांगितले.
रक्तदान शिबिरात कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत होता. अनेक तरुण, महिला, ज्येष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. रक्तदानानंतर त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची झलक स्पष्ट दिसत होती. मोदींच्या वाढदिवसानिमित्त समाजासाठी प्रत्यक्ष योगदान देण्याची संधी मिळाल्याबद्दल रक्तदात्यांनी आनंद व्यक्त केला.
या उपक्रमामुळे केवळ रक्तसाठ्याला हातभार लागला नाही, तर कार्यकर्त्यांनी “ ईश्वर सेवा हीच मानव सेवा” या भावनेतून विभागातील नागरिकांनी या रक्तदान शिबिरास पक्षाच्या पदाधिकारींनी कार्यकर्त्यांनी तसेच स्थानिक रहिवाशांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान करून उस्फुर्त सहभाग घेतला.