
नवी दिल्ली वृत्तसंस्था
नवी दिल्ली येथे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अनिल देसाई आणि खासदार अरविंद सावंत यांच्यासमवेत वांद्रे पूर्व येथील स्थानिक आमदार वरून सर देसाई यांनी भेट घेतली. या भेटीत वांद्रे (पूर्व) मतदारसंघातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पुनर्वसनप्रश्नी सविस्तर चर्चा झाली.
सांताक्रूझ हनुमान टेकडी, गोळीबार, डवरीनगर परिसरातील सुमारे ४२ एकर जमीन ही संरक्षण मंत्रालयाच्या मालकीची आहे. या जमिनीवर सध्या जवळपास ९,५०० झोपड्या असून त्यात ५० ते ६० हजार लोक राहत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया रखडलेली आहे. काही वर्षांपूर्वीच या परिसराचा सर्वेक्षण अहवाल ‘एसआरए’मार्फत तयार करण्यात आला होता; मात्र त्यानंतर प्रकल्प पुढे सरकलेला नाही. याच संदर्भात पावसाळी अधिवेशनात लक्ष्यवेधी सूचना देखील करण्यात आली होती.
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी संपूर्ण मुद्दा ऐकून सकारात्मक भूमिका व्यक्त केली. राज्य सरकारशी चर्चा करून या प्रश्नावर लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.
यापूर्वी मुख्यमंत्री यांनाही या विषयात निवेदन देण्यात आले असून तोडगा काढण्याची मागणी केली आहे. “या परिसरातील नागरिकांना त्यांचे हक्काचे पक्के घर मिळालेच पाहिजे, यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सातत्याने प्रयत्नशील राहील,” असे वरून सर देसाई यांनी स्पष्ट केले त्यांनी नुकतीच ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई यांच्या समवेत वांद्रे पूर्व येथील स्थानिक आमदार वरून सरदेसाई यांनीही यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.