
पुणे (विभागीय प्रतिनिधी सुनील कलशेट्टी
पुणे (दिनांक २२ डिसेंबर ) ५ डिसेंबर २०२४ रोजी राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. १५ डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि २१ डिसेंबरला खाते वाटप करण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खाते वाटपात अर्थ खाते देण्यात आले आहे. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खातेवाटपावर भाष्य केले. त्याने समाधान असमाधानाचा मुद्दा उपस्थित करत प्रत्येकाला मिळालेल्या खात्याला न्याय देण्याची आवाहन केले.
महायुती सरकारच्या २३७ आमदारांच्या बहुमताचा उल्लेख करत ते म्हणाले की, जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी काम करू, बारामतीच्या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष बारामतीकर काय करू शकता ते सर्व महाराष्ट्राने पाहिले, त्याबद्दल मी बारामतीकरारांचे आभार मानतो धन्यवाद देतो त्यांनी वाढलेल्या जबाबदारीबद्दल ही सांगितले. तसेच मोठ्या मंत्रिमंडळामुळे खाते वाटपाचे आव्हान निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. आज त्यांनी आपल्या बारामती मतदारसंघात परतल्यानंतर पहाटेच विविध कामाचा आढावा घेतला. यावेळी एका दुकानाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलताना ३ मार्च रोजी राजाचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज बारामतीत जाहीर नागरी सत्कार होणार आहे. तसेच त्यांची सभा देखील होणार आहे.
अजित पवार म्हणाले, गेल्या दोन महिन्यांमध्ये आचारसंहितेमुळे बरीच कामे पडली आहे, ती पुन्हा सुरू करायची आहेत. काल खातेवाटप झाले लवकरच सर्वजण कामाला लागतील कॅबिनेट मंत्र्यांची संख्या फार मोठी आहे ३७ कॅबिनेट मंत्री आहेत आणि राज्यमंत्री फक्त सहा आहेत प्रत्येक मंत्र्याला एक एक खाते देण्याची वेळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली आहे. काहीजण समाधान आहे तर काहीजण असमाधान आहेत. उद्या परवा जाऊन कारभार स्वीकारायचा आहे. तीन मार्चला आपला संकल्प आहे. तो आत्ता मला एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वासात घेऊन सादर करायची आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, इतक्या लोकांनी वेगळ्या प्रकारचे निवेदन दिले आहेत. थोडा वेळ द्या. वेगवेगळे खाते वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्याकडे आहेत. काल अधिवेशन संपले आणि प्रत्येक अंधारात आपल्या भागामध्ये गेले आहेत. उद्या सोमवार मंगळवारी चार्ज घेतल्यानंतर थोडासा वेळ लागल्यानंतर बाकीचे कामे केले जातील, लगेच अग्र धरू नका, असे आवाहनही अजित पवार यांनी केले
आज पहाटेपासून बारामती मतदारसंघातील विविध कामाचा आढावा घेतला तसेच बारामतीतील श्रीमंत बाबूजी नाईक वाडा, मारुती मंदिर आणि क-हा नदी परिसरातील विकास कामाची पाहणी केली. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्याची बातचीत करून कामकाजाबाबतचे तांत्रिक माहिती जाणून घेतली आणि काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना केल्या