
मुंबई:प्रतिनिधी
खार वेलिंग्टन जिमखाना येथे नाताळ सणानिमित्त भव्य ख्रिसमस बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. समाजसेविका सौ.पल्लवी कुणाल सरमळकर यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या आणि उत्कृष्ट नियोजन आणि व्यवस्थापनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. समाजातील नातेसंबंध वाढवणारे आणि उत्सवांना आनंद देणारे असे कार्यक्रम सामाजिक एकात्मता मजबूत करण्यात आणि सद्भावना वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, यावर त्यांनी प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला विधानसभा नेते श्री कार्ल सिक्वेरा हे देखील उपस्थित होते. स्थानिक रहिवाशांचा उत्साही सहभाग आणि आनंदी वातावरण यामुळे हा ख्रिसमस बाजार लक्षवेधी ठरला.
ख्रिस्ती बांधवाचा ख्रिसमस हा सण जरी असला तरी सर्व धर्माचे लोकं हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या सणाच्या काही दिवसांआधीपासूनच त्याच्या तयारीला सुरुवात होते. यादरम्यान ख्रिसमसच्या सजावटीचे सामान आणि दिव्यांची खरेदी मोठ्याप्रमात केली
जाते. मुंबईत ख्रिसमस मोठ्या थाटात साजरा केला जातो,याचे कारण म्हणजे मुंबईच्या किनारपट्टीवर आजही अनेक ख्रिस्ती बांधवांची वस्ती आणि त्यांचे देवस्थान आहेत. जे ख्रिसमसच्या काळात गजबजलेले असतात. त्यामुळेच तर इतर सणांप्रमाणे ख्रिसमस हा सण मुंबईच्या प्रमुख सणापैकी एक मानला जाऊ लागला आहे. याच कारणामुळे ख्रिसमस सणाच्या तयारीसाठी मुंबईतील अनेक बाजारपेठा या काळात सजलेले दिसून येतात.