
मुंबई:प्रतिनिधी
शिवसेना नेते, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनिल देसाई ह्यांच्या माध्यमातून गरजू बाल रुग्णांसाठी सुरु करण्यात येणाऱ्या ‘विशेष मोफत शस्त्रक्रिया’ उपक्रमाचे उद्घाटन आज मातोश्री येथे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी केले.
ह्या उपक्रमांतर्गत फिरता दवाखाना, दुभंगलेले ओठ व टाळू शस्त्रक्रिया, बाल हृदयरोग शस्त्रक्रिया, मोतीबिंदू शस्त्रक्रिया ह्यासारख्या १०० मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. ह्यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, उपनेते माजी महापौर मिलिंद वैद्य, विभागसंघटक माजी महापौर श्रध्दा जाधव, विभागप्रमुख प्रमोद शिंदे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.