
मुंबई प्रतिनिधी
भारताच्या झपाट्याने होत असलेल्या आर्थिक विकासात काही जिल्हे आघाडीवर आहेत. हे जिल्हे केवळ आर्थिकदृष्ट्या समृद्ध नाहीत, तर देशाच्या जीडीपीला मोठे बळ देणारे ठरले आहेत. भारताच्या टॉप 10 श्रीमंत जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राचे दोन जिल्हे झळकले आहेत. विशेष म्हणजे पहिल्या क्रमांकावर अपेक्षेप्रमाणे मुंबई असून, दुसऱ्या जिल्ह्याचे नाव ऐकून तुम्हीही थक्क व्हाल — पुणे!
देशातील माहिती तंत्रज्ञान, व्यापार, उद्योग, चित्रपट, बंदर आणि पर्यटन क्षेत्रांमुळे काही विशिष्ट जिल्ह्यांनी अभूतपूर्व प्रगती साधली आहे. हेच जिल्हे आज भारताच्या आर्थिक आराखड्याचे आधारस्तंभ बनले आहेत. चला तर मग जाणून घेऊया या टॉप 10 श्रीमंत जिल्ह्यांची यादी—
1. मुंबई (महाराष्ट्र)
भारतातील सर्वात श्रीमंत जिल्हा म्हणून मुंबई अग्रस्थानी आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचे हृदय मानली जाणारी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. बीएसई, एनएसई, आरबीआय यांसारख्या वित्तीय संस्था तसेच हजारो कॉर्पोरेट कार्यालये येथे कार्यरत आहेत. चित्रपटसृष्टी, शेअर बाजार आणि सेवा क्षेत्रांमुळे मुंबईचा महाराष्ट्राच्या जीडीपीमधील वाटा जवळपास 87 टक्के आहे.
2. दिल्ली
राजकीय राजधानी असलेली दिल्ली हे देशातील दुसरे सर्वात श्रीमंत केंद्र आहे. येथे केंद्र सरकारची प्रमुख कार्यालये, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे हेडक्वार्टर्स, तसेच परदेशी दूतावास कार्यरत आहेत. दिल्लीचा जीडीपी 10 लाख कोटी रुपयांहून अधिक आहे.
3. बंगळुरू (कर्नाटक)
भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळख असलेले बंगळुरू हे देशातील सर्वात मोठे आयटी हब आहे. इन्फोसिस, विप्रो, टीसीएस यांसारख्या आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्या येथे आहेत. स्टार्टअप संस्कृतीने येथील अर्थव्यवस्थेला नवे बळ दिले आहे.
4. हैदराबाद (तेलंगणा)
आयटी, फार्मा आणि बायोटेक उद्योगांच्या झपाट्याने झालेल्या वाढीमुळे हैदराबाद हे भारतातील एक प्रमुख आर्थिक केंद्र ठरले आहे. एचआयटीईसी सिटी आणि गचीबोवली येथे असंख्य आंतरराष्ट्रीय कंपन्या कार्यरत आहेत.
5. चेन्नई (तामिळनाडू)
‘डेट्रॉईट ऑफ इंडिया’ अशी ओळख असलेले चेन्नई हे ऑटोमोबाईल, आरोग्यसेवा आणि आयटी क्षेत्रात अग्रेसर आहे. येथे देशी-विदेशी कंपन्यांचे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे.
6. पुणे (महाराष्ट्र)
शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे हे महाराष्ट्रातील दुसरे सर्वात श्रीमंत जिल्हे ठरले आहे. येथे आयटी, ऑटोमोबाईल, मॅन्युफॅक्चरिंग आणि एज्युकेशन हब म्हणून जबरदस्त प्रगती झाली आहे. पुण्यातील मुळशी, हिंजवडी, वाघोलीसारख्या आयटी क्लस्टर्सनी शहराचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे.
7. अहमदाबाद (गुजरात)
गुजरातची व्यावसायिक राजधानी अहमदाबाद ही कापड, रसायन, रिअल इस्टेट आणि स्टार्टअप्ससाठी ओळखली जाते. येथे विविध प्रकारच्या उद्योगांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.
8. सुरत (गुजरात)
‘डायमंड सिटी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुरतमध्ये हिरे कापण्याचा उद्योग आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखला जातो. कापड उद्योगामुळेसुद्धा सुरत आर्थिक दृष्ट्या अत्यंत मजबूत आहे.
9. कोलकाता (पश्चिम बंगाल)
पूर्व भारताचे आर्थिक केंद्र असलेले कोलकाता हे बंदर, व्यापार आणि बँकिंग क्षेत्रांमुळे आघाडीवर आहे. येथे देशातील जुन्या वित्तीय संस्थांचे मुख्यालयही आहेत.
10. विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश)
विशाखापट्टणमला ‘आंध्र प्रदेशचे औद्योगिक केंद्र’ मानले जाते. येथील पोलाद, खत, पेट्रोकेमिकल आणि बंदर उद्योगांमुळे जीडीपीत मोठे योगदान दिले जाते.
शेवटी एक गोष्ट निश्चित आहे – महाराष्ट्रातील केवळ मुंबई नव्हे, तर पुणेसुद्धा आर्थिकदृष्ट्या देशाला दिशा देत आहे. ही गोष्ट प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचीच!