
मुंबई, प्रतिनिधी
बाळासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बनावट टेलिग्राम अकाउंट तयार करण्यात आलं असून, त्या माध्यमातून संशयास्पद लिंक्स नागरिकांना पाठवण्यात येत आहेत. संबंधित लिंक ओपन केल्यास मोबाईल हॅक होण्याची शक्यता असून, नागरिकांनी ती लिंक उघडू नये, असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
पक्षाकडून यासंदर्भात सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात येत असून, हे फेक खाते लवकरात लवकर बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तोपर्यंत नागरिकांनी अशा कुठल्याही मेसेजवर क्लिक करू नये किंवा त्यावर उत्तर देऊ नये, असे आवाहन करण्यात आलं आहे.
पक्षाच्या कार्यकर्त्यांसह सर्व नागरिकांनी सावध राहून अशा प्रकारच्या बनावट संदेशांपासून स्वतःचा आणि इतरांचा बचाव करावा, असेही आवाहन करण्यात आलं आहे.