
सातारा-प्रतिनिधी
सातारा – राष्ट्रीय सहकारी संघ यांच्या वतीने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस “सर्वोत्कृष्ट बँक” पुरस्कार भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ (NCUI) चे अध्यक्ष श्री. दिलीप संघवी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रमोद कर्नाड तेलंगणा राज्य सहकारी बँकेचे माजी अधिकारी श्री. श्रीनिवास राव यांचे शुभ हस्ते बँकेचे संचालक श्री. दत्तानाना ढमाळ, श्री. सुनील खत्री, श्री. रामराव लेंभे, श्री. लहुराज जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, अधिकारी श्री. वैभव सावंत, श्री. तुषार साबळे यांनी पुरस्काराचा स्वीकार केला.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्हयाची अर्थवाहिनी असून, ग्रामीण व शहरी जनतेचा आर्थिक स्तर उंचावण्याचा तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जलद सेवा पुरविणेचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये आदर्श असणारी बँक म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा विशेष उल्लेख आहे. जिल्हयातील सर्वसामान्यांचे आर्थिक उन्नतीसाठी राबवित असलेल्या विविध कर्ज योजना, कर्ज वसुलीबाबत सतर्कता, प्रभावी वसुली यंत्रणा, ठेवी व कर्जे यामधील लक्षणीय वाढ, उत्कृष्ट निधी नियोजन, ‘शून्य’ टक्के निव्वळ एन. पी. ए., दर्जात्मक कामकाज, गुणवत्ता व आधुनिक बँकिंगव्दारे ग्राहकाभिमुख सेवा यामुळे आयएसओ ९००१-२०१५ मिळालेले मानांकन, तसेच सामाजिक बांधिलकी कायमच जपत असलेने बँकिंग क्षेत्रामध्ये एक वेगळा ठसा उमठविलेला असून याच सर्वंकष कामकाजाबद्दल सर्वोत्कृष्ट बँक म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे.
या पुरस्काराबद्दल बँकेचे अध्यक्ष श्री. नितीन पाटील म्हणाले, सहकारी बँकांचे देशाच्या ग्रामीण विकासात फार मोठे योगदान आहे. आदर्शवत व उज्वल परंपरा, पारदर्शक कारभार तसेच उत्कृष्ट कार्यप्रणाली यामुळे बँकेची ख्याती राज्याबरोबरच देशातही झाली आहे. मा. संचालक मंडळाने आखून दिलेली ध्येय-धोरणे व त्यांची प्रभावी अंमलबजावणी, जिल्हयातील सर्वसामान्य शेतक-यांची बँकेवर असलेली अढळ निष्ठा, आर्थिक शिस्त, विकास संस्था, सर्व सभासद संस्था, ग्राहक, कर्जदार, हितचिंतक यांच्या सदिच्छा यामुळेच बँक प्रगतीपथावर पोहोचली आहे .
याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, आदर्शवत व उज्वल परंपरा, पारदर्शक कारभार तसेच उत्कृष्ठ कार्यप्रणाली यामुळे बँकेची ख्याती राज्याबरोबरच देशातही झाली आहे. या पुरस्कारांमुळे बँकेच्या नांवलौकिकामध्ये आणखी भर पडली आहे. मा. संचालक मंडळाने आखून दिलेली ध्येय-धोरणे व त्यांची प्रभावी अंमलबजावणी, जिल्हयातील सर्वसामान्य शेतक-यांची बँकेवर असलेली अढळ निष्ठा, आर्थिक शिस्त, विकास संस्था, सर्व सभासद संस्था, ग्राहक, कर्जदार, हितचिंतक यांच्या सदिच्छा यामुळेच बँक प्रगतीपथावर पोहोचली आहे. बँकेने राखलेला शुन्य टक्के एन .पी .ए ., १००% कर्जवसुली, उत्तम व्यवस्थापन, नाबार्ड व आर .बी .आय . चे नियमांचे काटेकोर पालन तसेच बँकींग व्यवसायातील विविध रेशो बँकेने राखले आहेत. बँकेच्या सर्वंकष उत्कृष्ट कामकाजामुळे बँकेस शासकीय, निमशासकीय, सहकारी, खाजगी अशा विविध नामांकित संस्थांकडून आजअखेर ११३ पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
श्री. दिलीप संघवी यांनी सातारा जिल्हा बँकेचा, देशामध्ये गौरवशाली परंपरा व बँकिंग क्षेत्रामध्ये आदर्श बँक म्हणून विशेष उल्लेख केला. श्री. प्रमोद कर्नाड यांनीही बँकेच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामकाजाची प्रशंसा केली.
या पुरस्काराबद्दल बँकेचे जेष्ठ संचालक श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले, संचालक ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ना. श्री. मकरंद पाटील, माजी सहकार मंत्री श्री. बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष श्री. अनिल देसाई तसेच सर्व संचालक सदस्य यांनी अभिनंदन करून बँकेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .