
सातारा प्रतिनिधी
सातारा – तारळे प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवरील उर्वरित शेरे येत्या १५ दिवसांत उठवावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. या संदर्भातील आढावा बैठक त्यांनी घेतली.
बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव तसेच प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तारळे प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात २० गावे येतात. यापैकी ११ हजार ९२२ खातेधारकांच्या जमिनीवरील शेरे आधीच उठविण्यात आले असून उर्वरित ४ हजार ९५१ खातेधारकांच्या जमिनीवरील शेरे अद्याप बाकी आहेत. हे शेरे वेळेत पूर्ण करावेत, असेही पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले.