
सातारा प्रतिनिधी
सातारा | सातारा तालुका पोलिसांनी हरवलेल्या मोबाईल शोध मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. एकूण 11 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 76 हरवलेले मोबाईल हस्तगत करण्यात आले असून, यापैकी 53 मोबाईल मालकांना परत करण्यात आले आहेत. उर्वरित 23 मोबाईल परत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली सीईआयआर पोर्टल आणि तांत्रिक सहाय्याचा वापर करून महाराष्ट्रासह इतर राज्यांतून मोबाईल शोधण्यात आले.
मोबाईल शोध मोहिमेत सीईआयआर पोर्टलची जबाबदारी पाहणाऱ्या मपोकॉं. वर्षा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहायक पोलिस निरीक्षक विनोद नेवसे आणि त्यांच्या टीमने ही मोहीम राबवली. या यशस्वी कारवाईबद्दल सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले आहे.