
सातारा तालुका पोलीस ठाणे दिनांक ११/१२ /२०२४ रोजी फिर्यादी सुनिल कुमार विश्वनाथ गर्जे वय ३५ वर्ष व्यवसाय केमिकल ट्रेडिंग रा रूम न २ शर्मा चाळ कचोरे गाव, श्री कृष्ण नगर कल्याण पूर्व कल्याण ठाणे यांनी मौजे वर्ये तालुका जिल्हा सातारा गावचे हद्दीतील विठ्ठल मंगलम हॉटेलचे ५० मिटर अंतरावर रोडच्या बाजूला अलीकडे येथुन त्यांचे रोख रक्कम व मोबाईल फोन चोरुन घेऊन गेलेबाबतचा गुन्हा दाखल केला होता.सदर गुन्हयाचे अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक सो , सातारा, समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक सो , सातारा,श्रीमती वैशाली कडुकर, मा. उपविभागीय अधिकारी सातारा विभाग, सातारा श्री राजीव नवले यांचे मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री निलेश तांबे यांनी सदर गुन्हयातील आरोपीस तात्काळ ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्याने सातारा तालुका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री निलेश तांबे, श्री व्ही. बी. नेवसे सहा. पोलीस निरीक्षक,श्री एस.एस. काटकर सहा. पोलीस निरीक्षक, श्री. अनिल मोरडे सहा. पोलीस निरीक्षक व सातारा तालुका पोलीस ठाणेचे डी.बी. पथकाने सदर आरोपीची गोपनिय माहिती मिळवुन दोन संशयित इसम यांना किनी वाठार, कोल्हापुर येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसोशीने चौकशी केली असता चौकशी दरम्यान सदर आरोपी यांनी तक्रारदार यांचे रोख रक्कम व मोबाईल फोन चोरुन घेऊन गेलेची कबुली दिली. तसेच आरोपी यांचेकडुन रोख रक्कम व मोबाईल फोन ताब्यात घेऊन सदर गुन्हयामधील दोन आरोपी अटक केली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास श्री व्ही. बी. नेवसे सहा. पोलीस निरीक्षक हे करित आहेत सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सो, सातारा, समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक साो, सातारा, श्रीमती वैशाली कडुकर, मा. उपविभागीय अधिकारी सातारा विभाग, सातारा श्री राजीव नवले, सातारा तालुका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे श्री व्ही. बी. नेवसे सहा. पोलीस निरीक्षक श्री. अनिल मोरडे, सहा. पोलीस निरीक्षक, श्री एस.एस. काटकर सहा. पोलीस निरीक्षक, पोहवा राजु शिखरे, पोहवा मालोजी चव्हाण, पोहवा दादा स्वामी, पोना प्रदिप मोहीते, पोना सतिश बाबर, पोकॉ शिवाजी डफळे, पोकॉ संदिप पांडव, पोकॉ धिरज पारडे, पोकॉ सचिन झनकर, पोकॉ रोहित बाबर व चालक सफौ माने यांनी केलेली आहे.सर्व अधिकारी व कर्माचारी यांचे श्री. समीर शेख, पालीस अधिक्षक सातारा, श्रीमती वैशाली कडुकर, अप्पर पोलीस अधिक्षक सातारा, श्री राजीव नवले, मा. उपविभागीय अधिकारी, सातारा यानी कौतुक व अभिनंदन केले आहे.