BMC Archives - Satara Pratinidhi

जुन्या डम्पिंग ग्राउंडमुळे मुंबईच्या प्रदूषणात भर; माहुल, गोवंडी, मानखुर्दवर विशेष लक्ष
मुंबई प्रतिनिधी

मुंबई : जुन्या डम्पिंग ग्राउंडमधून बाहेर पडणारा मिथेन वायू, वाहनांची वाढती वर्दळ आणि दगडखाणींमधून पसरणारी धूळ यामुळे मुंबईतील वायुप्रदूषणात भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर माहुल, गोवंडी, शिवाजीनगर, मानखुर्द आणि बीकेसी या प्रदूषणाच्या दृष्टीने संवेदनशील भागांवर महापालिका प्रशासन विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी ही माहिती दिली.

जुन्या डम्पिंग ग्राउंडमधून बाहेर पडणाऱ्या मिथेन वायूचा आसपासच्या परिसरावर परिणाम होत असल्याचे ढाकणे यांनी स्पष्ट केले. प्रदूषण कमी करण्यासाठी ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण तसेच कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. पुढील दोन ते तीन महिन्यांत वीजनिर्मिती सुरू होण्याची अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक १०० च्या खाली ठेवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे, तर तो १५० च्या खाली राखण्यासाठी अल्पकालीन उपायांवर भर दिला जात आहे. रस्त्यांवरील धूळ नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे आणि बांधकामांमधून निर्माण होणारी धूळ रोखणे आवश्यक असल्याचे ढाकणे यांनी नमूद केले. नवी मुंबईच्या दिशेने असलेल्या दगडखाणी आणि वाहनांची वर्दळ यांचाही प्रदूषणावर परिणाम होत आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी नगरसेवकांनी आवश्यक सूचना द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

The post जुन्या डम्पिंग ग्राउंडमुळे मुंबईच्या प्रदूषणात भर; माहुल, गोवंडी, मानखुर्दवर विशेष लक्ष appeared first on Satara Pratinidhi.

मुंबईकरांचा प्रवास होणार वेगवान!मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते तीन पुलांचे ऑनलाइन लोकार्पण
मुंबई प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने विद्याविहार, शीव आणि गोरेगाव पूर्व येथील तीन महत्त्वाच्या पुलांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. वर्षा निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार राजहंस सिंह, आमदार पराग शाह, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Mumbai Moves Faster with New Flyovers!

Glad to inaugurate various flyovers under the Brihanmumbai Municipal Corporation, including the Vidyavihar east-west connecting railway overbridge, flyover at the Sion railway station and the flyover from Ratnagiri Junction to Santosh Nagar… https://t.co/yH1hmGcCG9

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 22, 2026

मुंबई महानगर क्षेत्रातील पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे पूर्व-पश्चिम संपर्क अधिक सुलभ होणार असून, प्रवासासाठी लागणारा वेळ कमी होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

विद्याविहार रेल्वेस्थानकावरील नवीन पूल पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडतो. या मार्गावरील प्रवासासाठी पूर्वी सुमारे ३० मिनिटे लागत होती. नव्या पुलामुळे हा वेळ अंदाजे १० मिनिटांवर येणार आहे. घाटकोपर स्थानकाजवळील उड्डाणपुलावरील वाहतुकीचा ताण कमी होण्याचीही अपेक्षा आहे. या पुलाची एकूण लांबी ६०० मीटर असून, रुंदी १५.५० ते १७.५० मीटर आहे.

शीव रेल्वेस्थानकावरील ११२ वर्षे जुना पूल असुरक्षित झाल्याने त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. नवीन पूल पूर्वेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्गाला धारावी, वांद्रे व बीकेसी परिसराशी जोडणार आहे. या पुलाच्या कामासाठी ३३.५१ कोटी रुपये, तर पोहोच रस्त्यासाठी ३१.६२ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. पुलाची लांबी ५४.५ मीटर आणि रुंदी २६ मीटर आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांच्या विस्तारासाठीही हा पूल महत्त्वाचा ठरणार आहे. या मार्गिका पूर्ण झाल्यानंतर लोकल गाड्यांची संख्या आणि फेऱ्यांची वारंवारता वाढविणे शक्य होईल. पुलाचे काम नियोजित वेळेच्या सुमारे चार महिने आधी पूर्ण करण्यात आले आहे.

गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत गोरेगाव पूर्व येथील रत्नागिरी हॉटेल जंक्शन ते चित्रनगरी मार्गावरील संतोष नगरपर्यंत उभारण्यात आलेला उड्डाणपूल १.२६ किलोमीटर लांबीचा आणि सहा मार्गिकांचा आहे. या पुलामुळे रत्नागिरी हॉटेल जंक्शन, ए.के. वैद्य मार्ग आणि फिल्म सिटी रोड परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील संपर्क वेगवान होऊन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली प्रस्तावित दुहेरी भूमिगत बोगद्यापर्यंत पोहोचणे सुलभ होईल.

मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून रस्ते, कोस्टल रोड आणि अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या प्रकल्पांमुळे मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होऊन नागरिकांचा प्रवास सुलभ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

The post मुंबईकरांचा प्रवास होणार वेगवान!मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते तीन पुलांचे ऑनलाइन लोकार्पण appeared first on Satara Pratinidhi.

मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट! शीव, विद्याविहारसह गोरेगाव-मुलुंड मार्गावरील तीन उड्डाणपुलांचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, शीवचा ११२ वर्षे जुना पूल नव्याने सज्ज
मुंबई : प्रतिनिधी

मुंबई : मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी शीव, विद्याविहार आणि गोरेगाव-मुलुंड मार्गावरील तीन उड्डाणपुलांचे गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दृकश्राव्य माध्यमातून लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबईच्या महापौर रितू तावडे असतील. या पुलांमुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील वाहतूक अधिक सुरळीत होण्यासह प्रवासाचा वेळ वाचण्याची अपेक्षा आहे.

🔷शीव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपूल, विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपूल आणि गोरेगाव – मुलुंड जोड मार्गावरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी आज होणार खुले#mybmcupdates@CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu… pic.twitter.com/lw0Gtj7IRT

— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) October 22, 2026

शीव रेल्वे स्थानकाजवळील तब्बल ११२ वर्षे जुन्या पुलाची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांसाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही हे काम महत्त्वाचे होते. उपयोगिता वाहिन्या, जलवाहिन्या, वृक्ष आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या स्थलांतरासारख्या अडचणी असूनही हा पूल नियोजित वेळेपेक्षा चार महिने आधी पूर्ण झाला. हे काम फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. या पुलामुळे धारावी, वांद्रे, वांद्रे-कुर्ला संकुल आणि कुर्ला परिसराचा पूर्व द्रुतगती महामार्गाशी संपर्क अधिक सुलभ होणार आहे.

विद्याविहार रेल्वे स्थानकावरील नवीन उड्डाणपूल पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडतो. हा पूल सुरू झाल्यानंतर प्रवासाचा वेळ ३० मिनिटांवरून १० मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे सुमारे २० मिनिटांची बचत होण्यासह घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील विद्यमान पुलावरील वाहतुकीचा ताण कमी होऊ शकतो.

गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत गोरेगाव पूर्वेतील रत्नागिरी हॉटेल जंक्शनजवळ सुमारे १.२६ किलोमीटर लांबीचा तीन बाय तीन मार्गिकांचा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. जनरल अरुणकुमार वैद्य मार्गापासून दादासाहेब फाळके चित्रनगरी मार्गावरील संतोषनगरपर्यंत हा पूल आहे. या प्रकल्पात जुळ्या बोगद्यांचाही समावेश असून, गोरेगाव, दिंडोशी, मुलुंड आणि आसपासच्या भागांतील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

मुंबई महापालिकेच्या पूल विभागाने या तीनही पुलांची कामे पूर्ण केली आहेत. लोकार्पणानंतर हे पूल वाहतुकीसाठी सुरू झाल्यावर मुंबईकरांचा प्रवास किती वेगवान होतो आणि वाहतूक कोंडीला कितपत दिलासा मिळतो, हे स्पष्ट होईल.

The post मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट! शीव, विद्याविहारसह गोरेगाव-मुलुंड मार्गावरील तीन उड्डाणपुलांचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, शीवचा ११२ वर्षे जुना पूल नव्याने सज्ज appeared first on Satara Pratinidhi.

मुंबई किनारा रस्त्याच्या कामांना वेग; वेसावे ते भाईंदर प्रवास सुसाट होणार! आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडून पाहणी
मुंबई प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महानगरातील वाहतूक कोंडी कमी करून प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. सुमारे ६० किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे वेसावे ते भाईंदर ही शहरे किनारा रस्त्याने जोडली जाणार आहेत. या प्रकल्पाच्या विविध टप्प्यांतील कामांचा आढावा महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी घेतला. त्यांनी अनेक प्रकल्पस्थळांना प्रत्यक्ष भेट देऊन कामांची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्पाचे काम पॅकेज ए, बी, सी, डी, ई, एफ आणि दहिसर-भाईंदर जोडरस्ता (डीबीएलआर) अशा सात टप्प्यांत विभागण्यात आले आहे. या प्रकल्पातील विविध कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. आयुक्त भिडे यांच्या पाहणी दौऱ्याची सुरुवात दिंडोशी न्यायालय परिसरातील गोरेगाव कनेक्टरच्या उन्नत मार्गापासून झाली. गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरीकडे जाणारा उड्डाणपूल बांधून पूर्ण झाला आहे. हा पूल मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्पाशी जोडण्यात येणार आहे.

पॅकेज बी अंतर्गत गोरेगाव ते ओबेरॉय मॉलदरम्यान उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या ३८ खांबांपैकी ११ खांबांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम सुरू असून, त्याबाबतची सविस्तर माहिती आयुक्तांनी घेतली. गोरेगाव येथे सध्या अस्तित्वात असलेला वीर सावरकर उड्डाणपूल (एमटीएनएल) न पाडता त्याच्या वरून नवीन उन्नत पूल बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या नव्या पुलामुळे पश्चिम उपनगरातील वाहतुकीला किनारा रस्त्याची जोडणी मिळणार आहे. या कामाचीही त्यांनी पाहणी केली.

यानंतर ओशिवरा येथील लोखंडवाला संकुलातील मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्पाच्या कार्यालयात संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून कामांचा आढावा घेण्यात आला. पॅकेज ए अंतर्गत लोखंडवाला-मिल्लत नगर जंक्शन येथे सुमारे १० हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून, या ठिकाणी पायलिंगचे काम सुरू आहे. आयुक्तांनी या कामांची पाहणी केली. याच परिसरातील भगतसिंग नगर येथे ओशिवरा खाडीवर बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला.

भगतसिंग नगर येथील उड्डाणपुलाचे काम ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्याचे निर्देश आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले. खाडीच्या दुसऱ्या बाजूला असलेली काही बांधकामे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) माध्यमातून हटविणे आवश्यक असल्याने त्यासाठी पाठपुरावा करण्यासही त्यांनी सांगितले. उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत भगतसिंग नगरमधील झोपडपट्टी पुनर्विकासाचे कामही मार्गी लागणे गरजेचे आहे. त्यामुळे पूल उतरल्यानंतर विकास आराखड्यातील (डीपी) रस्त्याने नवीन लिंक रोडपर्यंत पोहोचणे शक्य होईल. यासाठी एसआरएकडे सातत्याने पाठपुरावा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

पॅकेज बी अंतर्गत मालाड येथील माईंडस्पेस गार्डन परिसरातील पायलिंगच्या कामांचीही आयुक्तांनी पाहणी केली. एमडीपी मार्ग आणि माईंडस्पेस उद्यान परिसरातील प्रस्तावित कामांची ठिकाणे, उद्यानाची संरक्षक भिंत तसेच उच्चदाब वीजवाहिनी यांसारख्या बाबींची त्यांनी माहिती घेतली.

मालाडमधील माईंडस्पेस ते कांदिवलीतील चारकोपदरम्यान पॅकेज सी आणि डी अंतर्गत प्रत्येकी सुमारे ३.९ किलोमीटर लांबीचे दोन भूमिगत बोगदे बांधण्यात येणार आहेत. यापैकी पॅकेज सीमध्ये उत्तर दिशेच्या, तर पॅकेज डीमध्ये दक्षिण दिशेच्या बोगद्याचे काम केले जाणार आहे. या बोगद्यांच्या बांधकामासाठी कांदिवलीतील चारकोप येथे लॉन्चिंग शाफ्ट उभारण्याचे काम सुरू आहे. यासाठी सुमारे ६५ मीटर लांब आणि ४० मीटर रुंद जागेत खोदकाम व पायलिंग सुरू असून, आयुक्तांनी या कामांचीही पाहणी केली.

पॅकेज ई अंतर्गत कांदिवलीतील चारकोप इंटरचेंज ते गोराई इंटरचेंजदरम्यान सुमारे ३.७८ किलोमीटर लांबीचा मार्ग विकसित करण्यात येत आहे. या कामाचीही आयुक्त अश्विनी भिडे यांनी पाहणी केली. या दौऱ्यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उपायुक्त (पायाभूत प्रकल्प) गिरीश निकम, प्रमुख अभियंता (मुंबई किनारा रस्ता-उत्तर) मंतय्या स्वामी, उपप्रमुख अभियंता वैभव गांधी यांच्यासह संबंधित अभियंते आणि सल्लागार उपस्थित होते.

The post मुंबई किनारा रस्त्याच्या कामांना वेग; वेसावे ते भाईंदर प्रवास सुसाट होणार! आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडून पाहणी appeared first on Satara Pratinidhi.

ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच; पालिकेच्या २४ अटींचे बंधन
मुंबई प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दसरा मेळाव्याचा शिवाजी पार्क मैदानावरील मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई महापालिकेच्या जी-उत्तर विभागाने खासदार अनिल देसाई यांच्या अर्जानंतर मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, ही परवानगी देताना पालिकेने आयोजकांसमोर तब्बल २४ अटी ठेवल्या आहेत. ध्वनिप्रदूषण, मैदानाची स्वच्छता, सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर पालिकेने स्पष्ट बंधने घातली आहेत.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांचे स्वतंत्र दसरा मेळावे होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवरील मेळाव्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. यंदा ठाकरे गटाला १९ ऑक्टोबर रोजी पूर्वतयारीसाठी, तर २० ऑक्टोबर रोजी मुख्य मेळाव्यासाठी मैदान वापरण्याची परवानगी मिळाली आहे.

पालिकेच्या अटींनुसार, मैदानाच्या वापरासाठी प्रतिदिन ५०० रुपये भाडे आणि त्यावर १८ टक्के वस्तू व सेवा कर, तसेच २५० रुपये परवाना शुल्क भरावे लागणार आहे. याशिवाय २० हजार रुपयांची अनामत रक्कम आगाऊ जमा करणे बंधनकारक आहे. २० ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता मैदानाचा ताबा मिळणार असून, रात्री १२ वाजेपर्यंत मैदान रिकामे करावे लागणार आहे.

उच्च न्यायालयाच्या रिट याचिका क्रमांक २१८/२०१० आणि संबंधित आदेशांनुसार शिवाजी पार्क हे शांतता क्षेत्र असल्याने त्यासंबंधीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. रात्री १० नंतर ध्वनिवर्धक किंवा लाऊडस्पीकर वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी आयोजकांवर असेल. मैदानात कोणत्याही वाहनाला प्रवेश दिला जाणार नाही, तसेच वाहनतळाची व्यवस्थाही करता येणार नाही.

मैदानात खोदकाम करणे, खड्डे पाडणे, खिळे ठोकणे किंवा अन्य प्रकारे नुकसान करण्यास बंदी आहे. कार्यक्रम संपल्यानंतर कचरा, घाण आणि निर्माल्य हटवून मैदान पूर्ववत करावे लागणार आहे. मैदानाचे नुकसान झाल्यास अनामत रक्कम जप्त केली जाईल आणि पुढील वर्षी परवानगी नाकारली जाऊ शकते, असा इशारा पालिकेने दिला आहे. तसेच, स्टेजसाठी खोदकाम किंवा पक्के बांधकाम करण्यास मनाई असून, बॅनर आणि जाहिरातींसाठी संबंधित विभागाची स्वतंत्र परवानगी घ्यावी लागेल.

मेळाव्यासाठी मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाची स्वतंत्र परवानगी घेणे आवश्यक आहे. रस्ता किंवा पदपथावर अतिक्रमण करून नागरिकांना अडथळा निर्माण करता येणार नाही. मैदानात स्वयंपाक करणे, चूल पेटवणे किंवा अग्नीचा वापर करण्यासही मनाई आहे. विद्युत जोडणीसाठी नियमानुसार परवानगी घेऊन सुरक्षिततेची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कार्यक्रमातील कायदा-सुव्यवस्था राखण्याची संपूर्ण जबाबदारी आयोजकांची राहणार आहे. कोणताही गोंधळ किंवा आक्षेपार्ह भाषण होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. कार्यक्रमात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि विम्याची जबाबदारीही आयोजकांवर असेल. नैसर्गिक कारणांमुळे किंवा पावसामुळे कार्यक्रम रद्द झाल्यास त्यासाठी पालिका जबाबदार राहणार नाही. पालिकेने परवानगी रद्द केल्यास आयोजकांना नुकसानभरपाई किंवा अन्य दावा करता येणार नाही.

ही परवानगी केवळ मैदान वापरण्यापुरती असून, अन्य आवश्यक परवानग्या स्वतंत्रपणे घ्याव्या लागणार आहेत. परवानगी दुसऱ्या कोणाकडे हस्तांतरित करता येणार नाही. अटींचा भंग झाल्यास जी-उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना परवानगी रद्द करण्याचा अंतिम अधिकार राहणार आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवरील ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळाली असली, तरी पालिकेच्या २४ अटींचे पालन आयोजकांना करावे लागणार आहे.

The post ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच; पालिकेच्या २४ अटींचे बंधन appeared first on Satara Pratinidhi.

वांद्रेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाला कटआउट-बॅनरचा विळखा; उद्यान कटआउटमुक्त करण्याची मागणी
मुंबई प्रतिनिधी

मुंबई : वांद्रे पूर्व येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात मोठ्या प्रमाणात बॅनर व कटआउट लावले जात असल्याने उद्यानाचे सौंदर्य तसेच डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची दृश्यता बाधित होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे उद्यान कटआउट व बॅनरमुक्त ठेवावे, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या मुंबई युवक आघाडीचे कार्याध्यक्ष विश्वास जाधव यांनी केली आहे.

उद्यान परिसरात सध्या लावण्यात आलेले अनधिकृत बॅनर व कटआउट तातडीने हटवावेत आणि भविष्यात आवश्यक परवानगीशिवाय असे साहित्य लावले जाणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी मागणी जाधव यांनी केली. प्रशासनाने कारवाई न केल्यास कलेक्टर कार्यालयासमोर कायदेशीर व लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

The post वांद्रेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाला कटआउट-बॅनरचा विळखा; उद्यान कटआउटमुक्त करण्याची मागणी appeared first on Satara Pratinidhi.

मुंबईतील अनधिकृत बॅनर आणि पोस्टरवर महापालिकेची कडक नजर; क्यूआर कोड नसल्यास थेट कारवाई
मुंबई प्रतिनिधी

मुंबई : शहरात परवानगीशिवाय लावले जाणारे फ्लेक्स, बॅनर, पोस्टर आणि स्टिकर्स रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कडक मोहीम सुरू करण्याची तयारी केली आहे. मुंबईचे विद्रूपीकरण थांबवण्यासाठी अनधिकृत जाहिरातींविरोधात ‘शून्य सहिष्णुता’ धोरण राबवण्याचे निर्देश महापौर रितू तावडे यांनी दिले आहेत.

महापालिकेच्या परवानगीने लावण्यात येणाऱ्या प्रत्येक अधिकृत जाहिरातीवर परवाना क्रमांक, परवान्याची मुदत, मुद्रकाचे नाव आणि अधिकृत क्यूआर कोड असणे बंधनकारक केले जाणार आहे. हा क्यूआर कोड मोबाईलने स्कॅन करून संबंधित जाहिरात अधिकृत आहे की नाही, हे गस्ती पथक तसेच नागरिक तपासू शकतील. क्यूआर कोड नसलेला बॅनर, फलक किंवा पोस्टर अनधिकृत मानून तो तातडीने जप्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबईत सण आणि राजकीय कार्यक्रमांच्या काळात मोठ्या प्रमाणात जाहिरातींचे फलक लावले जातात. यातील अनेक फलकांना परवानगी नसते. विशेष म्हणजे कार्यक्रम संपल्यानंतरही हे फलक तसेच राहतात. त्यामुळे अशा जाहिरातींवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत. याबाबत महापौर रितू तावडे यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्रही पाठवले आहे.

जाहिरातींसाठी नवीन नियम तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार अमित साटम यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासनाची संयुक्त बैठक लवकरच होणार आहे.

सर्व राजकीय पक्षांना सहकार्याचे आवाहन

अनधिकृत बॅनर आणि फलकांवर होणाऱ्या कारवाईला सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, यासाठी महापौरांकडून पक्षांच्या प्रमुखांना आणि नेत्यांना पत्र पाठवले जाणार आहे. नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी परवानगीशिवाय बॅनर किंवा फलक लावू नयेत, असे आवाहन करण्यात येणार आहे.

या कारवाईत कोणत्याही राजकीय पक्षाला वेगळी वागणूक दिली जाणार नाही. कायदा सर्वांसाठी समान असेल, असे महापौरांनी स्पष्ट केले आहे. मुंबई महानगरपालिका कायद्यातील कलम ३२८ आणि ३२८(अ) तसेच महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरण प्रतिबंध अधिनियम, १९९५ अंतर्गत दोषींवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. गरज पडल्यास पोलिसांत गुन्हेही दाखल केले जातील.

वारंवार परवानगीशिवाय फ्लेक्स, बॅनर आणि पोस्टर छापणाऱ्या प्रिंटर्स, कंत्राटदार आणि जाहिरात एजन्सींवरही कठोर कारवाई केली जाणार आहे. अशा व्यक्ती किंवा संस्थांना केवळ दंड न करता कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली जाणार आहे.

जाहिरात एजन्सींना पीव्हीसीऐवजी कापडी आणि पर्यावरणाला कमी नुकसान करणाऱ्या साहित्याचा वापर करण्यास तसेच डिजिटल एलईडीचा पर्याय वापरण्यास मार्गदर्शन केले जाणार आहे. जाहिरातींच्या परवानग्या देण्यासाठी सध्याच्या बाह्य जाहिरात धोरणात बदल करून एकाच ठिकाणी ऑनलाइन परवानगी मिळेल, अशी व्यवस्था करण्याचेही प्रस्तावित आहे. यामुळे अनधिकृत जाहिरातींमुळे महापालिकेचा बुडणारा कोट्यवधी रुपयांचा परवाना महसूल वाचण्यास मदत होणार आहे.

जप्त करण्यात आलेले पीव्हीसी आणि प्लास्टिकचे साहित्य पुन्हा रस्त्यावर किंवा नाल्यांमध्ये जाऊ नये, याचीही काळजी घेतली जाणार आहे. या साहित्यावर घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत योग्य पद्धतीने प्रक्रिया केली जाणार आहे.

अनधिकृत फलक किंवा जाहिरातींबाबत नागरिकांना महापालिकेच्या १९१६ या मदत क्रमांकावर, अधिकृत संकेतस्थळावर किंवा ‘mybmc’ ॲपद्वारे तक्रार करता येणार आहे. आलेल्या तक्रारींवर जास्तीत जास्त ७२ तासांत कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागात झालेली कारवाई, वसूल केलेला दंड आणि दाखल केलेल्या गुन्ह्यांची माहिती आठवड्याला महापौरांना सादर केली जाणार आहे.

The post मुंबईतील अनधिकृत बॅनर आणि पोस्टरवर महापालिकेची कडक नजर; क्यूआर कोड नसल्यास थेट कारवाई appeared first on Satara Pratinidhi.

मुंबईच्या राणीबागेची सफर महागणार; २५ रुपयांचे तिकीट ५०, तर ५० रुपयांचे १००, मुंबईकरांच्या खिशाला बसणार झळ
मुंबई प्रतिनिधी

मुंबईतील प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय अर्थात राणीबागेची सफर लवकरच महागण्याची शक्यता आहे. महापालिकेने राणीबागेतील प्रवेश शुल्कात थेट दुप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केल्याची माहिती आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास लहान मुलांसाठीचे तिकीट २५ रुपयांवरून ५० रुपये, तर प्रौढांसाठीचे तिकीट ५० रुपयांवरून १०० रुपये होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांसह बाहेरून येणाऱ्या पर्यटकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.

महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी महसूलवाढीसाठी विविध पर्यायांचा आढावा घेण्याचे निर्देश दिल्यानंतर महापालिकेच्या विविध विभागांकडून उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तपासले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राणीबागेच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे समजते. अंतिम निर्णय अद्याप झालेला नसून, प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतरच नवीन दर लागू होतील.

पेंग्विनमुळे पर्यटकांची संख्या वाढली

भायखळ्यातील राणीबाग सुमारे ५३ एकर परिसरात पसरलेली आहे. येथे बिबट्या, कोल्हा, तरस, अस्वल यांसह विविध प्राणी आणि पक्षी आहेत. २०१७ मध्ये पेंग्विन कक्ष सुरू झाल्यानंतर राणीबागेच्या आकर्षणात मोठी भर पडली. त्यामुळे पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत असून, सुट्टीचे दिवस, शाळांच्या सहली आणि पर्यटन हंगामात राणीबागेत मोठी गर्दी पाहायला मिळते.

वर्षभरात २५ लाखांहून अधिक पर्यटक

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल २५ लाख ४२ हजार १३५ पर्यटकांनी राणीबागेला भेट दिली. या माध्यमातून महापालिकेला ९ कोटी ८५ लाख ८७ हजार रुपयांचा महसूल मिळाला.

एप्रिल २०२६ मध्ये १ लाख ९१ हजार ६१५ पर्यटकांनी राणीबागेला भेट दिली. त्यातून ७५ लाख ३९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. मे महिन्यात पर्यटकांची संख्या आणखी वाढून ३ लाख १० हजार ६५४ झाली आणि महापालिकेला १ कोटी २० लाख ४१ हजार रुपयांचा महसूल मिळाला. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही पर्यटकांचा प्रतिसाद चांगला असल्याचे सांगण्यात येत आहे.

महापालिकेसमोर महसूलवाढीचे आव्हान

मुंबईत सध्या दोन लाख कोटी रुपयांहून अधिक किमतीची विविध विकासकामे सुरू आहेत. त्याचवेळी महापालिकेच्या मुदत ठेवींमध्ये घट होत असून, महापालिकेचा अर्थसंकल्प ८० हजार ९५२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्यावर महापालिकेचा भर आहे.

याच पार्श्वभूमीवर राणीबागेच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. मात्र, दरवाढीचा अंतिम निर्णय महापालिकेच्या मंजुरीनंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सध्या राणीबागेला भेट देणाऱ्या पर्यटकांना जुनेच दर लागू आहेत.

The post मुंबईच्या राणीबागेची सफर महागणार; २५ रुपयांचे तिकीट ५०, तर ५० रुपयांचे १००, मुंबईकरांच्या खिशाला बसणार झळ appeared first on Satara Pratinidhi.

सांताक्रुझमध्ये गटार साफ करताना दुर्घटना; चेंबरमध्ये गुदमरून कामगाराचा मृत्यू, एक जखमी
मुंबई प्रतिनिधी

मुंबई : सांताक्रुझमध्ये गटार साफ करण्यासाठी महापालिकेच्या चेंबरमध्ये उतरलेल्या दोन कामगारांपैकी एका कामगाराचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. या दुर्घटनेत दुसरा कामगार गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सांताक्रुझमधील व्ही. एन. देसाई रुग्णालयासमोरील रोड क्रमांक ८ येथे ही घटना घडली.

मृत कामगाराचे नाव संतोष गणपत काष्टे (४७) असून जखमी कामगाराचे नाव अजय ध्यानचंद ठाकूर (२६) आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत व्ही. एन. देसाई रुग्णालयासमोरील रोड क्रमांक ८ येथील एका सोसायटीची गटार लाईन ब्लॉक झाली होती. ही गटार लाईन साफ करण्यासाठी सोसायटीने सोमवारी सकाळी खासगी कामगारांना बोलावले होते.

साफसफाईचे काम सुरू असताना कामगार सोसायटीच्या गटारातून पुढे जात रस्त्यावरील महापालिकेच्या चेंबरमध्ये उतरले. यावेळी चेंबरमधील विषारी वायू किंवा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे दोघांना त्रास झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात संतोष काष्टे यांचा गुदमरून मृत्यू झाला, तर अजय ठाकूर जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच जखमी अजय ठाकूर याला तातडीने व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, संतोष काष्टे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

या प्रकरणी वाकोला पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधितांकडून आवश्यक माहिती घेतली जात असून, त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

The post सांताक्रुझमध्ये गटार साफ करताना दुर्घटना; चेंबरमध्ये गुदमरून कामगाराचा मृत्यू, एक जखमी appeared first on Satara Pratinidhi.

गोरेगावमध्ये सार्वजनिक शौचालयात केमिकलच्या उग्र वासाने दोघांचा मृत्यू; परिसर सील
मुंबई प्रतिनिधी

मुंबई : राम मंदिर (पूर्व) परिसरातील सार्वजनिक शौचालयातून रासायनिक वायूची गळती झाल्याने दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मृणालताई ब्रिजजवळ, पारसी पंचायत गेटसमोर असलेल्या सार्वजनिक शौचालयात ही दुर्घटना घडली. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, शौचालयातून अचानक तीव्र रासायनिक वास येऊ लागला. या ठिकाणी गेलेल्या दोन तरुणांना गुदमरल्यासारखा त्रास होऊन त्यांची प्रकृती बिघडली.

घटनेची माहिती मिळताच मुंबई महापालिका अग्निशमन दल, पोलीस, १०८ रुग्णवाहिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) अधिकारी तसेच पालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. संभाव्य रासायनिक धोका लक्षात घेऊन परिसराची पाहणी करण्यात आली. दोन्ही तरुणांना तातडीने उपचारासाठी ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी पहाटे ३.४९ वाजता दोघांनाही मृत घोषित केले. मृतांची नावे प्रभाकर धनिवार (२४) आणि भाविन देसाई (१८) अशी आहेत.

दरम्यान, नेमक्या कोणत्या रसायनामुळे ही दुर्घटना घडली, ते रसायन सार्वजनिक शौचालयात कसे आले आणि दोन्ही तरुणांच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. संबंधित यंत्रणांकडून घटनास्थळाची तपासणी सुरू असून, पोलिसांकडूनही या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.

The post गोरेगावमध्ये सार्वजनिक शौचालयात केमिकलच्या उग्र वासाने दोघांचा मृत्यू; परिसर सील appeared first on Satara Pratinidhi.