क्राईम न्यूज Archives - Satara Pratinidhi

कर्जाच्या विळख्यातून भयंकर अंत! आधी आई, पत्नी आणि दोन चिमुकल्यांचा गळा चिरला; नंतर कुटुंबप्रमुखाने रेल्वेखाली संपवले जीवन, भोपाळ हादरले!
भोपाळ :

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. घरात आई, पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलांचे मृतदेह आढळले, तर कुटुंबप्रमुखाचा मृतदेह घरापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावरील रेल्वे रुळांवर सापडला. प्राथमिक तपासात कुटुंबप्रमुखाने आधी चार जणांची हत्या करून त्यानंतर रेल्वेखाली आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कर्जाचा वाढता डोंगर आणि व्यवसायातील आर्थिक नुकसान या भीषण घटनेमागचे संभाव्य कारण असल्याची चर्चा आहे.

घरात चार मृतदेह; रेल्वे रुळांवर पाचवा मृतदेह!

भोपाळमधील छोला मंदिर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालीखेडी परिसरात सोमवारी (२ नोव्हेंबर) ही धक्कादायक घटना उघडकीस आली. एका घरामध्ये वृद्ध महिला, विवाहित महिला आणि दोन लहान मुलांचे मृतदेह आढळून आले. चारही जणांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा होत्या. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, कुटुंबप्रमुख नरेंद्र साहू (३५) यांचा मृतदेह चोपडा कला परिसरातील रेल्वे रुळांवर आढळून आला. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. प्राथमिक तपासानुसार नरेंद्र यांनी आधी कुटुंबातील चार सदस्यांची हत्या केली आणि त्यानंतर रेल्वेखाली जीव दिल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचाही समावेश

या घटनेत मृत्यू झालेल्यांची ओळख पटली असून, नरेंद्र साहू यांची आई सरस्वती साहू (५०), पत्नी सोमलता साहू (२९), मुलगी कृती साहू (१०) आणि मुलगा खुश साहू (६) अशी मृतांची नावे आहेत. अवघ्या सहा आणि दहा वर्षांच्या दोन चिमुकल्यांचा या घटनेत मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी पाचही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. घटनास्थळावरून फॉरेन्सिक पथकाकडून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

केटरिंग व्यवसाय बंद पडला, कर्जदारांचा तगादा!

या संपूर्ण प्रकरणात आर्थिक अडचणींचा महत्त्वाचा पैलू समोर येत आहे. नरेंद्र साहू यांचा केटरिंगचा व्यवसाय होता. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांचा व्यवसाय बंद पडला होता. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले होते. त्यांनी काही लोकांकडून पैसे उसने घेतल्याची माहिती नातेवाइकांनी दिली आहे.

उसने घेतलेल्या पैशांच्या वसुलीसाठी संबंधितांकडून वारंवार तगादा लावला जात असल्याचेही सांगण्यात येत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून साहू कुटुंब आर्थिक विवंचनेत होते. याच तणावातून ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, आर्थिक संकट हेच या घटनेचे निश्चित कारण असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास

भोपाळ झोनचे पोलीस उपायुक्त आदर्शकांत शुक्ला यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची पाहणी केली. प्राथमिक माहितीनुसार, घरातील चारही जणांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले.

पोलीस आता घटनास्थळावरील पुरावे, शवविच्छेदन अहवाल आणि नातेवाइकांचे जबाब यांच्या आधारे तपास करत आहेत. नेमका घटनाक्रम काय होता, या पाच जणांच्या मृत्यूमागे कोणती परिस्थिती होती आणि आर्थिक तणावाची भूमिका किती महत्त्वाची होती, याचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, एका कुटुंबातील दोन निष्पाप चिमुकल्यांसह पाच जणांचा झालेला हा अंत समाजातील वाढत्या आर्थिक तणावाचा आणि कर्जाच्या विळख्याचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणारा ठरला आहे. मात्र, या घटनेची संपूर्ण वस्तुस्थिती पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

The post कर्जाच्या विळख्यातून भयंकर अंत! आधी आई, पत्नी आणि दोन चिमुकल्यांचा गळा चिरला; नंतर कुटुंबप्रमुखाने रेल्वेखाली संपवले जीवन, भोपाळ हादरले! appeared first on Satara Pratinidhi.

हॉटेलमध्ये एमडी विक्रीचा डाव उधळला! ७.७५ लाखांचे ड्रग्ज जप्त; दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
अंधेरीतील नामांकित हॉटेलवर वर्सोवा पोलिसांचा मध्यरात्री छापा

मुंबई प्रतिनिधी

मुंबईतील अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत अंधेरी पश्चिमेतील नामांकित हॉटेलमध्ये सुरू असलेला एमडी (मेफेड्रॉन) विक्रीचा डाव उधळून लावला. एस.व्ही.पी. नगर म्हाडा परिसरातील हॉटेलमध्ये अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोन आरोपींना वर्सोवा पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलच्या (एटीसी) पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १५५ ग्रॅम मेफेड्रॉन जप्त केले असून, त्याची बाजारातील किंमत अंदाजे ७ लाख ७५ हजार रुपये आहे. आरोपींकडून दोन आयफोनही हस्तगत करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे अंधेरी परिसरातील अंमली पदार्थांच्या व्यवहाराचे धागेदोरे पुन्हा एकदा समोर आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ ऑक्टोबर २०२६ रोजी वर्सोवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निवास रोकडे आणि एटीसी पथक नियमित गस्त व तपासणीचे काम करत होते. वरिष्ठांच्या आदेशानुसार रात्री उशिरापर्यंत परिसरातील हॉटेल आणि लॉजची तपासणी सुरू होती. याचवेळी पथकातील पोलीस हवालदार खोंडगे यांना गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. अंधेरी पश्चिमेतील एस.व्ही.पी. नगर म्हाडा परिसरातील एका नामांकित हॉटेलच्या रूम क्रमांक १०४ मध्ये दोन व्यक्ती एमडी या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आल्याचे या माहितीमध्ये सांगण्यात आले होते.

या माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपनिरीक्षक निवास रोकडे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपशिखा आव्हाड-वारे यांना तातडीने माहिती दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त, वर्सोवा विभाग यांना याबाबत अवगत करण्यात आले. माहितीची खातरजमा करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मिळताच एटीसी पथकाने मध्यरात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास संबंधित हॉटेलवर छापा टाकला.

पोलिसांनी रूम क्रमांक १०४ मध्ये प्रवेश केला असता तेथे दोन संशयित व्यक्ती आढळून आल्या. त्यांची झडती आणि चौकशी केली असता त्यांच्याकडे एमडी (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ आढळून आला. हा पदार्थ विक्रीच्या उद्देशाने आणल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यानंतर फॉरेन्सिक पथक आणि दोन पंचांच्या उपस्थितीत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पंचनामा करण्यात आला. या कारवाईत १५५ ग्रॅम मेफेड्रॉन, दोन आयफोन असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २२(क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

एमडीचा पुरवठादार कोण? पोलिसांकडून कसून तपास

आरोपींनी हा अंमली पदार्थ नेमका कुठून आणला, त्यांचा पुरवठादार कोण आहे, तसेच मुंबईतील आणखी कोणत्या ठिकाणी या अमली पदार्थाची विक्री केली जाणार होती, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. आरोपींच्या मोबाईल फोनमधील माहिती आणि संपर्कांच्या आधारे या व्यवहारामागील मोठे जाळे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (उत्तर प्रादेशिक विभाग) शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड, सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर आवारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपशिखा आव्हाड-वारे, पोलीस निरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) प्राजक्ता पवार आणि रात्रपाळी पोलीस निरीक्षक अमर डेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक निवास रोकडे, पोलीस हवालदार पवार, पोलीस हवालदार खोंडगे, पोलीस शिपाई खैरनार आणि पोलीस शिपाई ठोंबरे यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवास रोकडे करीत आहेत.

The post हॉटेलमध्ये एमडी विक्रीचा डाव उधळला! ७.७५ लाखांचे ड्रग्ज जप्त; दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात appeared first on Satara Pratinidhi.

बांधकामाच्या सळई चोरणारी टोळी गजाआड; मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
स्वप्‍नील गाडे, गुन्हे वार्ताहर

मुंबई : बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी सळईंची चोरी करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. ट्रेलरमधून मोठ्या प्रमाणात लोखंडी सळई चोरी करून त्याबदल्यात पैसे घेणाऱ्या या टोळीतील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत तब्बल १ कोटी ६४ लाख २५ हजार ९९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेला काही इसम आपापसांत संगनमत करून पैशांच्या मोबदल्यात ट्रेलरमधून बांधकामाच्या लोखंडी सळई चोरी करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करून कारवाईचे नियोजन करण्यात आले.

२८ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ५.५५ वाजण्याच्या सुमारास पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यालगत घाटकोपर पूर्व येथील हायवे सुविधा शौचालयाजवळ पोलिसांनी सापळा रचला. यावेळी आरोपी ३८ हजार ३८० किलो लोखंडी सळई चोरी करताना आढळले. या सळईंची किंमत २३ लाख २ हजार ८०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.

त्यानंतर चुनाभट्टी येथील जुगानी इंडस्ट्रियल इस्टेटमध्येही कारवाई करण्यात आली. येथे १ लाख ४ हजार ७५० किलो वजनाच्या लोखंडी सळई चोरी करताना आरोपींना पकडण्यात आले. या सळईंची किंमत ३१ लाख २३ हजार १९० रुपये आहे.

या दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण ५४ लाख २५ हजार ९९० रुपये किमतीच्या लोखंडी सळई जप्त केल्या आहेत. तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेले एकूण १ कोटी १० लाख रुपये किमतीचे तीन ट्रेलर आणि एक आयशर टेम्पोही जप्त करण्यात आला आहे. अशा प्रकारे एकूण १ कोटी ६४ लाख २५ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे. या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी गुन्हे प्रकटीकरण शाखेत गुन्हा क्रमांक १४६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२), ३१६ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतनगर पोलीस ठाण्यातही गुन्हा क्रमांक ११०७/२०२६ नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखेच्या कक्ष ७ मार्फत सुरू आहे.

पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण-१) नवनाथ ढवळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (डी-पूर्व) धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

गुन्हे शाखेच्या कक्ष ७ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ढोले, पोलीस निरीक्षक प्रदीप सरफरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनाजी साठे, अफरोज शेख, महेश शेलार, पोलीस उपनिरीक्षक अजय गोल्हार, नामदेव परबळकर तसेच कक्ष ७ कार्यालयातील पोलीस अंमलदारांच्या पथकाने ही कारवाई केली.

The post बांधकामाच्या सळई चोरणारी टोळी गजाआड; मुंबई गुन्हे शाखेची कारवाई appeared first on Satara Pratinidhi.

मुंबईत ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोन तरुणांना अटक
स्वप्‍नील गाडे, गुन्हे वार्ताहर

मुंबई : मुंबईतील एमआयडीसी पोलिसांनी हायड्रो गांजाची विक्री आणि वाहतूक करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील दोन तरुणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ किलो ८९६ ग्रॅम वजनाचा आणि ६६ लाख ३६ हजार रुपये किमतीचा हायड्रो गांजा जप्त करण्यात आला.

२९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.५० वाजण्याच्या सुमारास अंधेरी पूर्व येथील जे. के. इंडस्ट्रियल इस्टेटजवळील पेपर बॉक्स रोड परिसरात एमआयडीसी पोलिसांचे पथक गस्त घालत होते. यावेळी दोन तरुण संशयास्पदरीत्या फिरताना दिसले. पोलिसांना पाहून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तपासणी केली असता एका तरुणाकडील लाल प्लास्टिकच्या पिशवीत हायड्रो गांजा आढळला.

ओंकार राजेंद्र पवार (२८, रा. भाकरवाडी, ता. कोरेगाव) आणि पियुष मधुकर घोंगडे (२२, रा. वाठार स्टेशन, ता. कोरेगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही सातारा जिल्ह्यातून मुंबईत हायड्रो गांजाच्या विक्रीसाठी आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२४४/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २०(ब) आणि २९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे आणि सहायक पोलीस आयुक्त योगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम नायर व पोलीस निरीक्षक सुनील करांडे यांच्या देखरेखीखाली पोलीस उपनिरीक्षक रणजीत गोंदुकुणे, पोलीस हवालदार गौतम बडे, बाबू येडगे, सचिन ठोंबरे, पोलीस शिपाई लोखंडे आणि बिनल शिंगाणे यांनी ही कारवाई केली.

The post मुंबईत ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोन तरुणांना अटक appeared first on Satara Pratinidhi.

गोरेगावमध्ये १.२८ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; दिंडोशी पोलिसांची कारवाई
स्वप्‍नील गाडे, गुन्हे वार्ताहर

मुंबई : मुंबईतील गोरेगाव पूर्व परिसरात दिंडोशी पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी विशेष मोहिमेत मोठी कारवाई केली आहे. संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका आरोपीकडून ६४० ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) जप्त करण्यात आले असून, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १ कोटी २८ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

२६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४.४० वाजण्याच्या सुमारास गोरेगाव पूर्वेतील फिल्म सिटी रोडवरील हनुमान नगर परिसरात सॅटेलाइट टॉवरजवळ एक व्यक्ती पाठीवर निळ्या रंगाची बॅग घेऊन संशयास्पदरीत्या उभी असल्याचे अंमली पदार्थविरोधी पथकाच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली असता तो बॅगेत काहीतरी लपवत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्याला हटकले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पथकाने त्याला ताब्यात घेतले.

पोलिस निरीक्षक शिवशंकर भोसले यांच्या उपस्थितीत पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत बॅगेमध्ये ६४० ग्रॅम मेफेड्रॉन आढळले. या प्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११७१/२६ नोंदवण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २२(क) आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करून २७ ऑक्टोबर रोजी त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

अपर पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त गजानन राजमाने आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विजय भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे आणि पोलीस निरीक्षक शिवशंकर भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शांतमल कोळुरे, पोलीस हवालदार प्रदीप मोरे तसेच पोलीस शिपाई प्रवीण चव्हाण आणि नवनाथ शिंदे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

The post गोरेगावमध्ये १.२८ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; दिंडोशी पोलिसांची कारवाई appeared first on Satara Pratinidhi.

१५० सीसीटीव्ही फुटेजचा माग काढत घरफोडी टोळीचा पर्दाफाश! ओतूर पोलिसांची मोठी कारवाई; चौघांना अटक, ३६.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे प्रतिनिधी

पुणे : जुन्नर तालुक्यात रात्रीच्या वेळी घरफोड्या करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि ओतूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या कारवाईत चार आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे ३६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ओतूर ते नाशिकदरम्यानच्या सुमारे १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून पोलिसांनी या घरफोड्यांचा छडा लावला. पोलिसांच्या या यशस्वी तपासामुळे परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

१५० सीसीटीव्ही फुटेजमधून संशयित कारचा माग

ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५ ऑक्टोबर २०२६ रोजी घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या सूचनेनुसार पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी ओतूरपासून नाशिकपर्यंतच्या मार्गावरील सुमारे १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. या तांत्रिक तपासातून गुन्ह्याशी संबंधित संशयित कारची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यानंतर संबंधित वाहनाचा माग काढत पोलिसांनी संशयितांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. या तपासातून घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आले.

घरफोडी करणारे तिघे, चोरीचा माल विकत घेणारा चौथा आरोपी

या प्रकरणात वसीम मुनीर पठाण (वय २९), अदनान युनुस पठाण (वय २६) आणि सोनू उर्फ मोहम्मद शारीफ रसूल शेख (वय ४०) या तिघांना अटक करण्यात आली आहे. हे तिघेही नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लासलगाव परिसरातील रहिवासी आहेत.

चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या सागर अशोक शिंदे (वय ३०) यालाही पोलिसांनी अटक केली आहे. अशा प्रकारे घरफोडीच्या गुन्ह्यांशी संबंधित चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत.

सोन्याचे दागिने, चांदी, रोख रक्कम आणि कार जप्त

पोलिसांनी आरोपींकडून मोठ्या प्रमाणात चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये १९ तोळे सोन्याचे दागिने, २ किलो ७७० ग्रॅम चांदी, दोन लाख रुपये रोख, गुन्ह्यांसाठी वापरलेली कार आणि वायरलेस वॉकी-टॉकी यांचा समावेश आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ३६ लाख ५० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या कारवाईमुळे जुन्नर तालुक्यातील घरफोडीच्या घटनांच्या तपासाला महत्त्वपूर्ण यश मिळाले असून, या टोळीचे आणखी काही गुन्ह्यांशी संबंध आहेत का, याचा तपास करण्याच्या दृष्टीनेही ही कारवाई महत्त्वाची ठरणार आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम

पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव यांच्यासह पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव करीत आहेत.

The post १५० सीसीटीव्ही फुटेजचा माग काढत घरफोडी टोळीचा पर्दाफाश! ओतूर पोलिसांची मोठी कारवाई; चौघांना अटक, ३६.५० लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on Satara Pratinidhi.

निर्मल नगर पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई! वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर पाठलाग करून ३ चोरटे अटकेत
स्वप्‍नील गाडे, गुन्हे वार्ताहर

मुंबई : ओला-उबरसाठी वापरल्या जाणाऱ्या टोयोटा रुमियन कारमधून रेकी करून रस्त्यावर उभे असलेले मालाने भरलेले टेम्पो चोरणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना निर्मल नगर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत निर्मल नगर आणि शाहूनगर पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले असून, चोरीला गेलेला टाटा एस टेम्पो, टोयोटा रुमियन कार आणि टेम्पोमधील कपड्यांच्या गोण्या असा एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

आरोपी टोयोटा रुमियन कारमधून परिसराची रेकी करत असत. त्यानंतर रस्त्यावर उभे असलेले मालवाहू टेम्पो हेरून ते चोरी करून नेत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. विशेष म्हणजे, घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसतानाही पोलिसांनी तांत्रिक कौशल्याच्या आधारे आरोपींचा माग काढला आणि त्यांची ओळख पटवली.

त्यानंतर वांद्रे पूर्व येथील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर टोयोटा रुमियन कारचा सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी तिन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांना संबंधित गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत पारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक संतोष कोळगे यांनी तपास अधिकारी म्हणून काम पाहिले. या पथकात पोलीस हवालदार खंडारे, वाघमारे, परदेशी तसेच पोलीस शिपाई भोगले, कदम आणि कोळी यांचा समावेश होता.

The post निर्मल नगर पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई! वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर पाठलाग करून ३ चोरटे अटकेत appeared first on Satara Pratinidhi.

बांद्र्यात घरावर छापा; दीड कोटींचा चरस जप्त, ४० वर्षीय आरोपीला अटक
बांद्रे पश्चिमेत गुन्हे शाखेची कारवाई; दुसरा आरोपी फरार, शोध सुरू

स्वप्‍नील गाडे, गुन्हे वार्ताहर

मुंबई : अंमली पदार्थ विक्रीविरोधात कारवाई करत मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने बांद्रे पश्चिम येथील एका घरावर छापा टाकून १ किलो ५०५ ग्रॅम चरस जप्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार या चरसची किंमत सुमारे दीड कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी ४० वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली असून, अन्य एका आरोपीचा शोध सुरू आहे.

२४ ऑक्टोबर रोजी संबंधित व्यक्ती आपल्या घरातून अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने पंचांच्या उपस्थितीत घरावर छापा टाकला. या कारवाईत चरस जप्त करण्यात आला. याप्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला असून, या प्रकरणातील दुसऱ्या पाहिजे आरोपीचा शोध सुरू आहे.

The post बांद्र्यात घरावर छापा; दीड कोटींचा चरस जप्त, ४० वर्षीय आरोपीला अटक appeared first on Satara Pratinidhi.

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी ड्रग्ज विक्रीसाठी मुंबईत; ३ कोटींचा मुद्देमाल जप्त
स्वप्‍नील गाडे, गुन्हे वार्ताहर

मुंबई : बोरिवली पूर्व परिसरात मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी कक्षाच्या घाटकोपर युनिटने कारवाई करत १ किलो २८ ग्रॅम (१.०२८ किलो) एमडी अर्थात मेफेड्रॉन जप्त केले. या अंमली पदार्थाची किंमत ३ कोटी ८ लाख ४० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी खुनाच्या गुन्ह्यातील तीन सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे.

२५ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलिसांचे पथक गस्तीवर असताना बोरिवली पूर्व येथील नॅशनल पार्कसमोरील पश्चिम द्रुतगती मार्गावर, श्री कृष्णा कॉम्प्लेक्सच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ही कारवाई करण्यात आली. एमडी विक्रीसाठी जवळ बाळगल्याच्या संशयावरून पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले. झडतीमध्ये त्यांच्याकडून १ किलो २८ ग्रॅम मेफेड्रॉन मिळून आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये २८ वर्षांच्या दोन आणि ३९ वर्षांच्या एका व्यक्तीचा समावेश आहे. चौकशीदरम्यान या तिघांनी नालासोपारा येथून अंमली पदार्थ आणून विक्रीसाठी मुंबईत आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २२(क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त पूर्णिमा चौगुले-शृंगी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत आदाटे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक अभिजीत अहिरराव, सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघ, पोलीस उपनिरीक्षक पंकज पाटील, संदीप रहाणे आणि अन्य कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.

The post खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी ड्रग्ज विक्रीसाठी मुंबईत; ३ कोटींचा मुद्देमाल जप्त appeared first on Satara Pratinidhi.

जुन्या भांडणाचा सूड घेतला! विट्यात यंत्रमाग कामगाराच्या डोक्यात फरशी घालून निर्घृण खून; ४८ तासांत आरोपी जेरबंद
विटा/सांगली प्रतिनिधी

जुन्या भांडणाचा राग मनात धरून यंत्रमाग कामगाराच्या डोक्यात फरशीचे घाव घालून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना विटा शहरातील दत्तनगर परिसरात घडली. इम्तियाज शमशुद्दीन अन्सारी (वय ४२, सध्या रा. दत्तनगर, विटा; मूळ रा. चंदूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे मृत कामगाराचे नाव आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी विजय शंकर चव्हाण (वय ३१, रा. मेटकरी वस्ती, विटा) याला विटा पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अटक केली.

जुन्या वादातून टोकाचे पाऊल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्तियाज अन्सारी आणि विजय चव्हाण हे दोघेही विटा येथील पॉवरलूम कारखान्यात कामाला होते. कारखान्याचे मालक सचिन नंदकुमार भागवत यांच्या मालकीच्या खोलीत इम्तियाज राहत होता. याच ठिकाणी १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजण्यापूर्वी जुन्या भांडणाच्या रागातून विजय चव्हाण याने इम्तियाजच्या डोक्यात फरशीचे घाव घातले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या इम्तियाजचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे दत्तनगर परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी सचिन नंदकुमार भागवत (वय ३५, रा. आदर्शनगर, लेंगरे रोड, विटा) यांनी विटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विजय चव्हाण याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांचा सापळा; ४८ तासांत आरोपी अटकेत

खुनाच्या घटनेनंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी विटा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिस हवालदार अमोल पाटील आणि पोलिस कर्मचारी महेश देशमुख यांना मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी लेंगरे रोडवरील भांबर्डे टेक परिसरात सापळा रचला. या कारवाईत विजय चव्हाण याला घटनेनंतर ४८ तासांच्या आत ताब्यात घेण्यात आले.

अटकेनंतर आरोपीला विटा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २२ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या खुनामागील नेमके कारण आणि घटनेशी संबंधित अन्य बाबींचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास विटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश साळुंखे करीत आहेत.

The post जुन्या भांडणाचा सूड घेतला! विट्यात यंत्रमाग कामगाराच्या डोक्यात फरशी घालून निर्घृण खून; ४८ तासांत आरोपी जेरबंद appeared first on Satara Pratinidhi.