
मुंबई प्रतिनिधी
राष्ट्रवादी पक्षाचे दिवंगत नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरण मोठी माहिती समोर आली आहे. सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी झिशान अख्तर याला कॅनडात अटक करण्यात आली आहे.
त्याला कॅनडाच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत, असे सूत्रांनी सांगितले आहे. तो कचाट्यात सापडल्यामुळे आता बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अख्तर कॅनडा पोलिसांच्या ताब्यात
मिळालेल्या माहितीनुसार झिशान अख्तर हा कॅनडात पळून गेला होता. बनावट पासपोर्टच्या माध्यमातून तो भारतातून निघून थेट कॅनडात जाऊन पोहोचला होता. मात्र आता त्याला कॅनडातील पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं सूत्रांकडून कळतंय. कॅनडा पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
झिशानला मुंबईत आणलं जाणार
झिशान अख्तर हा कॅनडात पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया आता पार पाडली जाणार आहे. मुंबई पोलीस या झिशानला भारतात आणणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया आता पार पाडली जाणार आहे. त्यामुळे आता लवकरच झिशान अख्तर भारतात येणार आहे.
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात मोठे गौप्यस्फोट होणार?
गेल्या बऱ्याच दिवसांपासून मुंबई पोलीस झिशान अख्तरच्या मागावर आहेत. त्याचा शोध घेतला जातोय. पण आता तो कॅनडात असल्याचे समजले आहे. त्याला कॅनडाच्या पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे आता त्याला परत महाराष्ट्रात आणले जाण्याची शक्यता वाढली आहे.
महाराष्ट्रात आल्यानंतर मुंबई पोलीस त्याची कसून चौकशी करणार आहेत. या चौकशीतून अनेक महत्त्वाचे दुवे हाती लागण्याची शक्यता आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा मास्टरमाईंड अजूनही सापडलेला नाही. त्यामुळे झिशान अख्तर मुंबई पोलिसांच्या हाती लागला तर या हत्याप्रकरणाच्या मूळापर्यंत जाता येणे शक्य आहे. त्यामुळे आता आगामी काळात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्यावर 12 ऑक्टोबर 2024 रोजी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या प्रभागात हळहळ व्यक्त करण्यात आली होती.