
मुंबई प्रतिनिधी
दलित समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या ‘दलित पँथर’ या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बुद्धभूषण कुंदन गोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दलित पॅंथरच्या पक्षश्रेष्ठी मा. मलिका नामदेव ढसाळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
संघटने मुंबई अंधेरी येथील सम्राट अशोक हॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी भवन चारबंगला, अंधेरी येथे आयोजित कार्यक्रमात गोटे यांना अधिकृतपणे नियुक्तीपत्र सुपूर्द करण्यात आले.
या वेळी ‘ मलिका नामदेव ढसाळ’ यांनी त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करत, “गोटे यांचा गेल्या अनेक वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव संघटनेच्या उन्नतीस उपयोगी ठरेल,” असे मत व्यक्त केले.
गेल्या पाच दशकांपासून दलितांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचार विरोधात झगडणाऱ्या या संघटनेला देशभरात वेगळी ओळख मिळाली आहे. अशा संघटनेच्या नेतृत्वाची धुरा तरुण तडफदार मा.बुद्धभूषण कुंदन गोटे यांच्याकडे सोपवण्यात आल्याने संघटनेच्या आगामी कार्याला नवे बळ मिळणार आहे. असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. दलित पॅंथरचे मुंबई, महाराष्ट्रातील पँथर, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* दलित पँथरची पाच धोरणात्मक उद्दिष्टे जाहीर
नव्या कार्यकारिणीत संघटनेने पुढील काळात अंमलात आणावयाचे पाच महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत
1. शिक्षणात समान संधी व दर्जा : सर्व स्तरांवरील दलित विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, शिष्यवृत्ती आणि विशेष शैक्षणिक सुविधा देणे.
2. कठोर कायदा अंमलबजावणी : SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व पोलिसांची जबाबदारी निश्चित करणे.
3. अर्थसहाय्य व रोजगार, दलित उद्योजकांना शासकीय योजनांचा लाभ देणे, तसेच आर्थिक मदत पुरविणे.
4. खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करणे,शिक्षण व सरकारी नोकऱ्यांप्रमाणेच खासगी क्षेत्रातही आरक्षण लागू करणे.
5. सामाजिक सन्मान व सुरक्षितता, दलित वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा, सामाजिक समतेसाठी जनजागृती आणि सन्मानपूर्वक जीवनाचा अधिकार
नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून संघटनेला नवसंजीवनी मिळेल आणि दलित समाजाच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडली जाईल, अशी अपेक्षा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.