
मुंबई प्रतिनिधी
शिंदे गटाला आज मोठा धक्का बसला असून, विभाग क्रमांक १ मधील प्रमुख पदाधिकारी सुजाता शिंगाडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. मातोश्रीवर झालेल्या कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी शिंगाडे यांचे पक्षात औपचारिक स्वागत केले.
या वेळी शिवसेना नेते व खासदार विनायक राऊत, माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, महिला विभाग संघटक शुभदा शिंदे यांच्यासह विभाग क्र. १ मधील सर्व शाखाप्रमुख व शाखासंघटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रवेशामुळे विभागात ठाकरे गटाला नवे बळ मिळाले असून, आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात आहे.