
मुंबई प्रतिनिधी
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू असताना आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मोठे विधान केले. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे तेच होईल.आता संकेत नाही थेट बातमी देऊ असे सूचक वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात यावर चांगलीच चर्चा जोर धरू लागली आहे.
यावरच ठाकरेसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, मी एक सामान्य शिवसैनिक आहे माझ्या नेत्यांपेक्षा माझी काय भूमिका असणार आहे. दोघांनी वेळोवेळी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी देखील यावर सकारात्मक भूमिका स्पष्ट केली आहे.
अमित ठाकरे यांचे विधान देखील अत्यंत महत्वाचे विधान केले आहे. कौटुंबिक कार्यक्रमांना दोघे भेटत असतात एकमेकांची विचारपूस करत असतात आणि दोघांकडे एकमेकांचे फोन नंबरही आहे त्यामुळे दुसऱ्या तिसऱ्या फळीतील लोकांनी यावर प्रतिक्रिया देणे योग्य राहणार नाही. जर दोन्ही भावांनी युती केली तर त्यांना दुसऱ्या कोणाचा हात हातात घेण्याची गरज नाही अस सुषमा अंधारे म्हणाल्या.