
मुंबई प्रतिनिधी
वाहतूकदार बचाव कृती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आज काळबादेवी मुंबई येथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. वाहतूकदारांवर होणाऱ्या अन्यायकारक दंड प्रणाली विरोधात १५ जून २०२५ पासून आझाद मैदान, मुंबई येथे बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनाची पुर्वतयारी म्हणून ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
जर सरकारने वाहतूकदारांच्या समस्या त्वरित नाही सोडवल्या तर राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. या बैठकीस संघटनेचे संस्थापक उदयसिंह बर्गे, ठाणे जिल्हा वाहतूक सेवासंघाचे सेक्रेटरी भटेसिंग राजपूत, विकास स्वराज पार्टी चे अध्यक्ष रितेश साळेकर आणि त्यांचे पदाधिकारी तसेच गायवाडी चालक मालक संघटनेचे श्री ज्ञानदेव भिलारे, दत्तात्रय कदम उपस्थित होते.