
भिवंडी,सातारा प्रतिनिधी न्युज नेटवर्क
भिवंडी : भिवंडीतून आगीची भीषण घटना घडली आहे. भिवंडी तालुक्यातील राहणाळमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. भिवंडीमधील प्रेरणा कॉम्पलेक्समधील गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरातील लोकांची एकच धावाधाव झाली. या आगीची घटना घडताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं.
घटनास्थळी अग्निशामक दलाची एक गाडी आणि एक पाण्याचा टँकर पोहोचला आहे. अग्निशामक दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे.
गोदामात मोठ्या प्रमाणात हायड्रोलिक ऑयल, प्लास्टिकचे सामान आणि केमिकल ठेवण्यात आले होते. गोदामातून आगीचे लोट येत असून संपूर्ण गोदाम आगीत भस्मसात झाले आहे. परिसरात धुराचे साम्राज्य दिसत असून आकाशात दूरवरून धूर व आगीचे लोट दिसत आहे. आगीचे कारण अजून अस्पष्ट असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.