
गोंदिया प्रतिनिधी
राज्यातील महसूल विभागाच्या जिल्हाधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या असून आता उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या नियमित बदल्या काल दि,३०मे ला महसूल विभागाने तहसीलदारांच्या बदल्यांना सुरुवात केली असून १३ तहसीलदारांच्या बदल्यांची यादी जाहीर केली आहे.यामध्ये साालेकसाचे तहसिलदार नरसैय्या कोंडागुर्े यांची तुमसर तहसिलदार म्हणून बदली करण्यात आली आहे.तर लाखांदूरचे तहसिलदार वैभव पवार यांची धानोरा येथे बदली करण्यात आली.
राज्यात अनेक तहसीलदार नियमित बदलीसाठी पात्र असून काहींचे विनंती बदलीसाठीचे प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झालेले आहेत.येत्या आठवडाभरात अजून बदल्यांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.