मुंबई प्रतिनिधी
मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवन घाटात भीषण अपघात झाला आहे.
गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या भरधाव डस्टर कारने मागून कंटेनरला जोरदार धडक दिल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, तर तीन जखमी आहेत.
मृतांमध्ये दोन महिला असून, जखमींमध्ये एका चिमुकल्या मुलाचा समावेश आहे. अपघात इतका भयानक होता की डस्टर कार चक्काचूर झाली.
पोलीस आणि बचाव कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून, जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास सुरू आहे.
दुर्घटनेत मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेची नोंद पालघरच्या मनोर पोलीस ठाणे हद्दीत झाली आहे.
अपघात झाल्याचे कळताच घटनास्थळी पोलीस पोहोचले असून पंचनामा सुरु केला आहे.
अपघात झालेल्या कारलाबाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


