
धाराशिव प्रतिनिधी
राज्यभर महिलांवरील अत्याचाराच्या घटना सुरू असताना
पतीने दुसरे लग्न केले म्हणून धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका महिलेनं आज आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर पावसात पोलिसांची आणि या महिलेची झटापट झाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात ड्युटीवर असलेल्या महिला पोलिसांनी प्रसंगावधान साधून या महिलेला पकडले. पोलीस पैसे घेऊन पतीला मदत करत असल्याचा आरोपही आत्मदहन करणाऱ्या या महिलेनं केला आहे.
न्याय मागायला गेल्यावर अपहरणाची केस करु असे पोलिसांनी धमकावल्याचा आरोप या महिलेने केला आहे. आत्मदहन करणारी महिला धाराशिवच्या वाशी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या धनेश्वरी बोरगाव येथील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे. पतीनं दुसरे लग्न केले म्हणून या महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोच आत्मदन करण्याचा प्रयत्न केल्यानं परिसरात खळबळ उडाली होती. तातडीने या ठिकाणी पोलिस आल्याने अनर्थ टळला. यावेळी संबंधित महिला आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचं देखील पाहायला मिळालं. या महिलेनं पोलिसांवर देखील आरोप केले आहेत.
दरम्यान, या महिलेने पोलिसांवर देखील गंभीर आरोप केले आहेत. पोलिस पैसे घेऊन पतीला मदत करत असल्याचा आरोप केला आहे. पैसे घेऊन सगळे प्रकरण दाबले आहे. मला रात्री 12 वाजता चौकीला बोलवत होते असेही महिलेनी सांगितले. माझी चमडी उतरवील अशी भाषा पोलिसांनी वापरल्याचा आरोप या महिलेने केले आहे. पैसे घेऊन यासंदर्भातील पुरावे नष्ट केले आहेत. या प्रकरणाची महिला आयोगाने देखील दखल घेतली नसल्याचे या महिलेने सांगितले.