
ठाणे प्रतिनिधी
ठाणे येथील घोडबंदर रोडवर असलेल्या हवाईयन व्हिलेज को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने एका श्वानप्रेमी सदस्यास चक्क 5.5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
सुभाजित भट्टाचार्य असे या व्यक्तीचे नाव असून, तो कुत्र्यांसाठी एक निवाराघर चालवतो. कुत्रे पाळणे आणि ते सोसायटी आवारात फिरवणे याबाबत सोसायटीने त्यास हा दंड ठोठावल्याचे समजते. सुभाजित याने म्हटले आहे की, हा दंड सोसायटीने नव्हे तर कुत्रा आवडत नसलेल्या एका सोसायटी सदस्याने ठोठावला आहे.
तब्बल 5.71 लाख रुपयाचे देखभाल आणि दुरुस्ती बील
हवाईयन व्हिलेज को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा सदस्य असलेल्या सुभाजित भट्टाचार्य यास मे महिन्यामध्ये तब्बल 5.71 लाख रुपयाचे देखभाल आणि दुरुस्ती बील प्राप्त झाले. जे पाहून त्याचे डोळे विस्फारले. दरम्यान, बिलामध्ये असलेला तपशील वाचला तेव्हा त्यास बिल फुगण्याचे नेमके कारण समजले. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, भट्टाचार्य याने म्हटले आहे की, ही रक्कम सोसायटीने तो चालवत असलेल्या श्वान निवारा केंद्र आणि सोसाटीमध्ये कुत्र्यांना फिरवल्याबद्दल केलेली कारवाई होती. त्याने दावा केला आहे की, सोसायटीमध्ये पाळीव प्राण्यांना फिरविण्याची परवानगी असतानाही केवळ त्याच्यासाठी सोसायटीने बंदी घातली होती.
श्वान निवारा केंद्रात 20 कुत्र्यांचा निवास
सुभाजित भट्टाचार्य हा व्यक्ती ‘शेड्स ऑफ काइंडनेस फाउंडेशन’ चालवतो. ही एक स्वयंसेवी संस्था आहे. ज्यामध्ये सध्या सुटका केलेले 20 कुत्रे राहतात, ज्यांपैकी बरेच जण पॅराप्लेजिअस आहेत. भट्टाचार्य 15 वर्षांहून अधिक काळ प्राणी बचाव आणि कल्याणात कार्यरत आहेत. त्यांचा दावा आहे की 18 महिन्यांपूर्वी ते सोसायटीत स्थलांतरित झाल्यानंतर लवकरच समस्या सुरू झाल्या.
कुत्र्यावर गुन्हा दाखल, संगमनेर येथील घटना) सोसायटीने नऊ फेब्रुवारी रोजी, एक विशेष सर्वसाधारण सभा घेतली आणि ‘सोसायटी संकुलातील अनधिकृत कृती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भट्टाचार्य यांना दंड करण्याचा ठराव मंजूर केला. त्याने त्याचे श्वान निवारा कार्य 30 दिवसांच्या आत बंद करावे किंवा स्थलांतरित करावे असा ठराव करण्यात आला. तसेच, याची खात्री करण्यासाठी पाच सदस्यांची एक टीम तयार करण्यात आली.
जर त्याने सोसायटी नियमाचे पालन केले नाही तर त्यास मासिक 25,000 रुपये दंड आकारण्याची तरतूदही या ठरावात होती. एप्रिलमध्ये, भट्टाचार्य यांना 51,370 रुपयांचे देखभाल बिल मिळाले, ज्यामध्ये अतिरिक्त दंड आणि कीटक नियंत्रण शुल्क देखील समाविष्ट होते. नऊ एप्रिल रोजी, सोसायटीने त्यांना औपचारिक नोटीस बजावली की निवारा कुत्रे रात्री ओरडून त्रास निर्माण करतात आणि बंगल्याच्या मालकावर अस्वच्छ पद्धतींचा आरोप केला ज्यामुळे उंदीरांचा प्रादुर्भाव झाला.
सोसायटीने भट्टाचार्य यांना पुढे इशारा दिला की कीटक नियंत्रण खर्च आणि आवाज आणि प्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्याही स्थापनेचे बिल त्यास दिले जाईल त्याच्याकडून वसूल केले जाईल. जसे की ध्वनी अडथळे आणि काँक्रीट फ्लोअरिंग. दरम्यान, भट्टाचार्य याने फ्री प्रेस जर्नलकडे दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले की, माझ्या अनेक कुत्र्यांना मणक्याचे विकार असल्याने, मला त्यांना फिरायला घेऊन जाणे अनिवार्य आहे. परंतु आता मला ते बंद करण्यास भाग पाडले जात आहे. इतर सदस्यांप्रमाणेच माझ्या कुत्र्यांना फिरवण्यासाठी सोसायटीच्या सामान्य जागेचा वापर करणे हा माझा कायदेशीर अधिकार आहे परंतु कुत्र्यांचा द्वेष करणाऱ्या सदस्याच्या निर्देशानुसार.