
पुणे प्रतिनिधी
पुण्यातील वैष्णवी हगवणे हिने सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून 17 मे 2025 रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.या घटनेनंतर सासरा रविंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे पळून गेले होते.तर पती, सासू आणि नणंद यांना अटकेनंतर करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच पुण्यातील हडपसर येथे एका तरुणीने हुंड्यासाठी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
लग्नाला महिना होत नाही तोवर नवविवाहितेला सासरच्या मंडळींनी त्रास देण्यास सुरुवात केली.लग्नात हुंडा दिला नाही,मानपान केला नाही.या सततच्या त्रासाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागात घडली आहे.
दीपा उर्फ देवकी प्रसाद पुजारी (वय २२ रा. सातववाडी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. दीपाचे वडील गुरूसंगप्पा म्यागेरी (वय ५३, रा. कर्नाटक) यांनी हडपसर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.त्यानुसार पती प्रसाद चंद्रकांत पुजारी, सासू सुरेखा पुजारी, सासरे चंद्रकांत पुजारी आणि दीर प्रसन्ना पुजारी यांच्यावर हुंडा प्रतिबंधक कायदा,आत्महत्येस प्रवृत्त करणे व अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक राज्यातील विजापूर येथील सर्व सामान्य कुटुंबातील दीपा उर्फ देवकी प्रसाद पुजारी ही नवविवाहित तरुणी होती.ती उच्चशिक्षित दीपा गावातील महिलांना आर्थिक साक्षर करायचे काम करत होती.गावातील महिलांना एकत्र करून तिने बचतगट स्थापन केला होता,महिलांना पैशांची बचत कशी करावी,याबाबत प्रशिक्षण देत असायची,त्या कामाची दखल घेऊन कर्नाटक सरकारने अधिकृतरित्या दिपाला त्या गावातील बचत गट प्रमुख केले होते.
त्याच दीपा यांचा प्रसाद यांच्यासोबत लग्न झाले.पूजा यांच्या कुटुंबियांनी लग्नामध्ये 5 तोळे सोने आणि 10 ते 12 लाखांचा खर्च केला.त्यानंतर दीपा आणि प्रसाद हे पुण्यात राहण्यास आल्यावर, पती,सासरे, सासू,दीर यांनी त्रास देण्यास सुरुवात केली.या सततच्या त्रासाला कंटाळून 19 मे 2025 रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेबाबत मयत दीपा पुजारी यांच्या वडीलांनी हडपसर पोलिस स्टेशनमध्ये पती प्रसाद चंद्रकांत पुजारी, सासू सुरेखा पुजारी, सासरे चंद्रकांत पुजारी आणि दीर प्रसन्ना पुजारी यांच्या विरोधात तक्रार दिली.त्यानुसार पुजारी कुटुंबीयांविरोधात हुंडा प्रतिबंधक कायदा,तसेच आत्महत्येस प्रवृत्त करणे व अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे हडपसर पोलिसांनी सांगितले.