
जालना प्रतिनिधी
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना एक लाख रुपयाची लाच घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली ही घटना ताजी असतानाच
जालन्यातून अशीच एक घटना समोर आली आहे.
शहरात सुरु असलेले अवैध धंदे बंद करण्याचे काम पोलीस प्रशासनाचे आहे. मात्र अनेकदा काही पोलीस कर्मचारी हप्ते घेत हे अवैध धंद्यांवर कारवाई करत नाहीत. असाच काहीसा प्रकार जालन्यामध्ये समोर आला असून शहरात सुरु असलेला अवैध मटक्याचा धंदा सुरळीत सुरु ठेण्यासाठी २५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली.
हि रक्कम स्वीकारताना फौजदारासह पोलीस शिपाईला एसीबीने ताब्यात घेतले आहे.
जालना तालुका पोलीस ठाण्यातील फौजदार परशुराम पवार व पोलीस शिपाई लक्ष्मण शिंदे असे लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. या कारवाईमुळे जालना पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. जालना शहर तसेच परिसरात अवैध धंदे जोरदार सुरू आहेत. अशाच प्रकारे शहरातील तालुका जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीचा मटक्याचा धंदा सुरू होता. हा अवैध व्यवसाय विनाअडथळा सुरू राहावा; यासाठी पवार आणि शिंदे यांनी २५ हजार रुपयांची लाच मागितली होती.
दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांकडून २५ हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याने तक्रारदाराने नंदुरबार लाचलुचपत विभागाकडे थेट तक्रार दाखल केली. या तक्रारीची पडताळणी करून रात्रीच्या सुमारास एसीबीच्या पथकाकडून परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी संबंधित तक्रारदाराकडून फौजदारास लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. यात पोलीस शिपायाचा देखील सहभाग असल्याचे
‘गुन्हा दाखल’
जालना येथे मटक्याचा अवैध धंदा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच घेताना फौजदार परशुराम पवार आणि पोलीस शिपाई लक्ष्मण शिंदे यांना नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मात्र या कारवाईमुळे जालना पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.