
वार्ताहर -स्वप्नील गाडे
वांद्रे पूर्व विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून वरुण सरदेसाई, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले विद्यमान आमदार झीशान सिद्दीकी आणि मनसेच्या तृप्ती सावंत मैदानात उतरले आहेत.
मुंबई भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षा यांनी मनसेमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवल्यामुळे वरुण सरदेसाई आणि झीशान सिद्दीकी यांच्यासाठी ही लढत सोपी राहिली नाही.
शिवसेनेचे दिवंगत आमदार असलेल्या प्रकाश उर्फ बाळा सावंत यांच्या तृप्ती सावंत या पत्नी आहेत. त्यांनी 2015 सालच्या वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर नारायण राणेंचा पराभव केला होता.
तर गेल्या वेळी काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झालेले परंतु आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले विद्यमान आमदार झीशान सिद्दीकी हे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत.
काही दिवसांपूर्वी झीशान यांचे वडील बाबा सिद्दिकी यांची हत्या झाल्यानं खळबळ उडाली होती. त्यामुळे झीशान यांना त्यांच्या मतदारसंघात सहानुभूती मिळेल अशी चर्चा आहे.
परंतु शिवसेना शिंदे गटाचे विभागप्रमुख कुणाल सरमळकर हे गेल्या ५वर्षा पासून वांद्रे पूर्व विभागा मध्ये जनतेची कामे करत आहेत या विभागात लोकांना स्थानिक चेहेरा हवा होता तो कुणाल सरमळकर यांचा जनतेला मिळाला आहे पक्षानी तिकीट नाकारल्या मुळे वांद्रे पूर्व विभागातील जनतेनीच त्यांना अपक्ष निवडणूक लढवण्याचा आग्रह केला होता.त्यांनी वांद्रे पूर्व १७६ विधानसभेतून अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.लोकांचा चांगलाच प्रतिसाद कुणाल सरमळकर यांच्या बाजूनी दिसून येत आहे. या मुळेच विरोधात उभे असलेल्या सगळ्याच उमेदवार्यांची चिन्ता वाढलेली आहे.
विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्वची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे. उद्धव ठाकरेंचं निवासस्थान मातोश्री हे या मतदारसंघात येतं.
त्यामुळे मातोश्रीच्या अंगणातून ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अत्यंत चुरशीच्या या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागली आहे.