
मुंबई प्रतिनिधी
मुंबईत स्वतःचं घर घेणं हे सर्वसामान्यांच्या
आवाक्याबाहेर गेल्याचं दिसत आहे. घराच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. साधा वन बिचएचके घेण्यासाठी कोट्यवधी रुपये मोजावे लागतात. वाढत्या किमतीमुळे मुंबईत घर घेण्याचं स्वप्न अधुरीच राहतात.
सर्वसामान्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी म्हाडाकडून 2024 नंतर आता पुन्हा एकदा बंपर लॉटरी जाहीर होणार आहे.जुलै महिन्यात म्हाडाच्या कोकण विभागाकडून सुमारे 4 हजार घरांची लॉटरी जाहीर होणार असून ठाणे कल्याणसारख्या शहरांचा यात समावेश आहे.
काही दिवसांपूर्वीच म्हाडाने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत घर खरेदी करणाऱ्यांसाठी म्हाडाने आनंदाची बातमी दिली होती. यंदाच्या वर्षातदेखील दिवाळीपूर्वीच मोठी लॉटरी काढली जाणार असल्याचं ते म्हणाले होते.. मुंबईत म्हाडाकडून जवळपास 5 हजार घरांची लॉटरी निघणार असल्याची माहिती म्हाडाचे सीईओ आणि उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.
घरे ठाणे-कल्याणमध्ये
जुलै महिन्यात चार हजार घरांची लॉटरी म्हाडा जाहीर करणार आहे. यात चितळसर येथे हाऊसिंग स्टॉकमधून उभारलेल्या 1173 घरांचा समावेश आहे. तर कल्याणमध्येही म्हाडा अडीच हजारांची लॉटरी काढणार आहे. म्हाडाची सर्वाधिक घरे ठाणे आणि कल्याणमध्ये राहणार आहेत. यंदा 2025-2026 च्या अर्थसंकल्पात ‘म्हाडा’च्या मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळांमार्फत एकूण 19 हजार 497 सदनिकांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
लवकरच जाहीर होणार लॉटरी?
म्हाडाकडून मुंबई मंडळात पाच हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार असून ही लॉटरी दिवाळी पूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात म्हाडाने राज्यात 19,496 घरांच्या बांधकामाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यापैकी 5199 घरे बांधण्यात येणार आहेत. याशिवाय पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण मंडळांमध्येही घरांची कामे सुरु आहेत. त्यानंतर संबंधित लॉटरी जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.