
मुंबई प्रतिनिधी
गोवंडी परिसरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव देशमुख यांना मंगळवार दि १३ रोजी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
१५ ऑगस्ट २०२४ रोजी या परिसरातील एका शाळेच्या गेटचे कुलूप तोडून काही जणांनी परिसरात जबरदस्तीने प्रवेश केला होता. यासंदर्भात शाळेच्या ट्रस्टीनी शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि धर्मादाय आयुक्त यांच्याकडे तक्रार दिली होती.
या प्रकरणात पोलीस संरक्षण आणि विरोधकांना ट्रस्टच्या परिसरात प्रवेश न देण्याच्या मोबदल्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव देशमुख यांनी तीन लाख रुपयांची मागणी केली होती.या बाबत ट्रस्टीने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.
मंगळवारी रात्री यातील १ लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत विभागाने त्याना रंगेहात पकडले असून पुढील कारवाई लाचलुचपत विभाग करीत आहे. मात्र यामुळे पुन्हा एकदा मुंबई पोलीस खात्यातील भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.