मालवण प्रतिनिधी
राजकोट-मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा ८३ फूट उंच भव्यदिव्य पुतळा उभारण्यात आला असून,
भव्य पुतळ्याचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

या ऐतिहासिक सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. सोहळ्याच्या प्रारंभी शिवरायांची महाआरती करण्यात आली आणि उपस्थित मान्यवरांनी पुतळ्याला अभिवादन केले.
कार्यक्रमाला बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह अनेक मान्यवर आणि हजारो शिवप्रेमी नागरिक, स्थानिक नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुतळ्याच्या उभारणीमुळे राजकोट-मालवण हे ठिकाण शिवभक्तांसाठी एक नवीन प्रेरणास्थान ठरणार असून, येथील पर्यटनालाही मोठा चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
हे ठिकाण भविष्यात शिवस्मरणाचे केंद्र ठरणार असून, इतिहासाची उजळणी करणाऱ्या पिढ्यांसाठी हे स्मारक एक प्रेरणादायी ठिकाण ठरेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


