
वार्ताहर – स्वप्नील गाडे
मुंबई उपनगरात “हेरॉईन”तस्करी करणाऱ्या ४ ड्रग्ज तस्करांना कांदिवली युनिटने मालवणी मालाड पश्चिम येथून मुद्देमालासहित केले अटक.
महानगरी मुंबईत तरुणाई अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकून गेली आहे.कॉलेज व शाळा शिकणारे विध्यार्थी ही या अंमली पदार्थाच्या वेसनाच्या आहारी गेले आहेत.
आज दिनांक-९/११/२०२४ रोजी मुंबई उपनगरात “हेरॉईन” ची तस्करी करणाऱ्या ४ परप्रांतीय इसमाच्या टोळीला अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखेतील कांदिवली युनिटच्या पथकाने मालवणी मालाड पश्चिम येथून मुद्देमाला सहित ताब्यात घेऊन.नमूद तस्करानचे ताब्यातून एकूण ५९४ ग्रॅम वजनाचा हेरॉईन एकूण किंमत रु २.३७ करोड पेक्षा जास्त किमतीचा अंमली पदार्थ मिळून आल्याने,नमूद इसमान विरोधात कांदिवली युनिट यांनी अं.प.वि.कक्ष गुन्हा रजि क्र.६८/२०२४ कलम ८(क)सह २१क,२९ एन.डी.पी. एस ऍक्ट १९८५अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.अटक करण्यात आलेले नमूद ४ आरोपी हे उत्तराखंड व उत्तरप्रदेश या परराज्यातून असून हेरॉईन हा अंमली पदार्थाची तस्करी करताना मिळून आले असून आरोपींचा सखोल तपास कांदिवली युनिट करत आहे.