
वार्ताहर -स्वप्नील गाडे
सायन कोळीवड्यातील महाराष्ट्र नगर परिसरात पहाटे १२:३०च्या सुमारास विवेक गुप्ता नावाच्या २२वर्षीय तरुणाची हत्त्या करण्यात आली.त्याच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. अँटॉप हिल पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर(प्रथम माहिती अहवाल)नोंदवला आहे.या गुन्ह्याच्या संदर्भात आत्तापर्यंत पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे,आणि आणखी कोणाचा सहभाग आहे हे शोधण्यासाठी अद्याप पोलीस तपास सुरू आहे.
वादावादी सुरू असताना लोकांचा एक गट आवाज करत रस्त्यावर गोंधळ घालत होता.एका लहानशा मारामारीत सुरू झालेल्या वादाचे रूपांतर गंभीर बाचाबाचीत झाले आणि कोणीतरी चाकूने हल्ला केला.जखमी व्यक्तीला अँटॉप हिल पोलिसांनी तात्काळ सायन रुग्णालयात नेले.मात्र त्याला वाचवण्याचे प्रयत्न करूनही पहाटे ३:३०वाजता विवेक गुप्ता याचा मृत्यू झाल्याचे सायन रुग्णालयातील डॉक्टरांकडून घोषित करण्यात आले.डी.सी.पी झोन-४ रागसुदा मॅडम सकाळी ५वाजेपर्यंत हॉस्पिटल आणि पोलीस स्टेशन मध्ये हजर होत्या.या घटनेशी संबंधित पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली असून तपास अधिकारी पोलीस निरीक्षक-दिपक जाधव/उपनिरीक्षक-केदार उमाटे हे पुढील तपास करत आहेत.
*आरोपी *
1) कार्तिक आर मोहन देवेंद्र
2) कार्तिक कुमार देवेंद्र
3) विकी मुत्तु देवेंद्र
4) मिनीअप्पण रवी देवेंद्र
5) कार्तिक आर मोगन ची पत्नी
(वरील पाचही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे पुढील कार्यवाही करीत आहोत)
*थोडक्यात हकीकत*
वर नमूद तारीख वेळी व ठिकाणी कार्तिक आर मोहन देवेंद्र याचा मोनू सोबत झालेल्या वादा दरम्यान भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या विवेक याचा राग मनात धरून कार्तिकवर मोहन देवेंद्र याने संगणमताने गैर कायद्याचे मंडळी जमवून साधारणतः 00:50 वाजता विवेक गुप्ता यास विकी याने बांबूने सागर मित्र मंडळाचा अध्यक्ष कार्तिकी आणि बॅटने व कार्तिक याची पत्नी व इतर लोक काही लोकांनी हातापायांनी तसेच राजपुटी यांनी त्याच्याकडे असणाऱ्या धारदार चाकूने विवेकच्या छातीवर, पोटावर,पाटीवर व हातावर वार करून त्याला ठार मारले म्हणून यांचे विरोधात कायदेशीर तक्रार आहे.