
कोल्हापूर प्रतिनिधी
येथील राज्य गुन्हे अन्वेषणच्या अधीक्षक मनीषा दुबुले आणि जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्यासह जिल्ह्यातील १७ जणांना आज विशेष पोलिस महासंचालक पदक जाहीर झाले.
राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडून आज २०२४ मधील पदके जाहीर झाली. त्यात राज्यातील पोलिस अधीक्षकांपासून पोलिस शिपाई पदापर्यंतच्या ८०० पोलिसांचा समावेश आहे. महाराष्ट्र दिनी १ मे रोजी याचे वितरण होणार आहे. या सर्वांनी त्यांच्या सेवेत केलेल्या विशेष कामगिरीबद्दल हे पदक जाहीर झाले आहे.
अधीक्षक दुबुले मूळच्या कोल्हापूरच्या आहेत. त्यांचे गाव आसुर्ले (ता. पन्हाळा) आहे. त्या राज्य गुन्हे अन्वेषणच्या अधीक्षक म्हणून गेली दोन वर्षे कोल्हापुरात कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी सांगली येथे अपर पोलिस अधीक्षक, दौंड येथे प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य, वासिम, लातूर येथेही सेवा बजावली आहे. त्यांना यापूर्वी अनेक पदके मिळाली आहेत. निरीक्षक झाडे जुना राजवाडा पोलिस ठाण्यात वर्षभर कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी तीन वर्षे कोडोली आणि शहापूर, इचलकरंजी येथे काम केले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच तपासात त्यांचा हातखंडा आहे.
अन्य पदकप्राप्त असे : पोलिस निरीक्षक – रविराज अनिल फडणीस, उपनिरीक्षक – जालिंदर अंकुश जाधव, नरसू भारमाना गावडे, महादेव नारायण कुराडे, अनिल संभाजी जाधव, जनार्दन शिवाजी खाडे. हवालदार – संजय दिनकर कुंभार, राजू रामचंद्र पट्टणकुडे, अरुण रवींद्र खोत, सागर जगन्नाथ चौगुले, हिंदुराव रामचंद्र केसरे, अनुराधा देवदास पाटील, रमेश श्रीपती काबंळे, युवराज भिवाजी पाटील, पोलिस शिपाई संग्राम पांडुरंग पाटील, यांच्या समावेश आहे.