
कोल्हापूर प्रतिनिधी
राज्यात गेल्या काही वर्षात अपघाताचे प्रमाण वाढले असून काही केल्या अपघाताच्या घटना कमी होताना दिसून येत नाहीत
कोल्हापूरच्या चंदगडमध्ये बेळगाव -वेंगुर्ला मार्गांवर ट्रक व बसचा भीषण अपघात झाला.
या भीषण अपघातात बस ड्रायव्हरचा दुर्दैवी मृत्यू झाला असून बसमधील 15 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
टक आणि बसचा अपघात एवढा भीषण होता की, बसचा पुढील भाग चेंदामेंदा झाला असून ट्रकच्या पुढील भागाचेही नुकसान झाले आहे.
दरम्यान, या अपघातामुळे पुन्हा एकदा बसच्या मेन्टेनन्स आणि खराब बसच्या वाहतुकीचा मुद्दा समोर आला आहे.
गेल्या अनेक दिवसापासून बेळगाव वेंगुर्ला रस्ताच्या रुंदीकरण रखडलं आहे. त्यामुळे, येथे अपघाताच्या घटना घडत आहेत.
दरम्यान, रस्ता अरुंद असल्याने वाहनांना जाताना-येताना अडचण निर्माण होत असून अपघातचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळत आहे.