
पालघर प्रतिनिधी
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि त्यांचे पाठीराखे यांना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा दिला जाईल, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर, संपूर्ण देशातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
मुंबई, कोकण समुद्र किनारपट्टीवर पोलिस दलानं गस्त वाढवली असून, ड्रोनद्वारे संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवलं जात आहे. समुद्र किनारपट्टीलगत तटरक्षक दलाच्या नौकांनी गस्त वाढवली असून, खबऱ्यांकडून वेगवेगवेळी माहिती मिळवली जात आहे. रात्रीच्या गस्तीसाठी शस्त्रधारी पथक तैनात करण्यात आली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील या हल्ल्याचे पडसाद उमटू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना आणि त्यामागील सूत्रधाराला दिली जाईल, असा इशारा दिल्यानंतर संपूर्ण देशात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिस देखील ‘अलर्ट मोड’वर आलं आहे. मुंबई पोलिस दल अॅक्शन मोडवर असून, समुद्र किनारपट्टीलगत गस्त वाढवली आहे.
मुंबईकोकण, पालघर या सागरी सीमेवर पोलिसांनी गस्त वाढवली आहे. पालघरच्या समुद्र किनाऱ्यासह जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करून नजर ठेवली जात आहे. पालघर पोलिसांबरोबरच तटरक्षक दलाने सागरी गस्त वाढली आहे. ड्रोनमार्फत समुद्रातील हालचालींवर देखील पालघर पोलिसांची नजर वाढवली आहे.
पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी समुद्रात संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अलर्ट मोडवर असून, खबऱ्यांसह विविध मार्गांनी लक्ष ठेवलं जात आहे. समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांची देखील संशयास्पद हालचालींची माहिती काढण्यासाठी मदत घेतली जात आहे, अशी माहिती दिली.
भारताविरोधीच्या कुरापतीविरोधात पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध केला जात आहे. हिंदू-मुस्लिम एकत्र येत, पाकिस्तानविरोधात कारवाईच्या मागणी होत आहे. सरकारला तसे निषेधाचे निवेदनं दिली जात आहे. देशात संतापाची लाट असतानाच, संपूर्ण पोलिस दल देखील अलर्ट मोडवर आहे. विशेष करून, मुंबई पोलिस दलाने सागरी किनारपट्टीवर गस्त वाढवली आहे. यासाठी मुंबई पोलिस दल अत्याधुनिक तंत्राचा पुरेपुर मदत घेत आहे.