
मुंबई प्रतिनिधी
हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी नवीमुंबई करांसाठी आनंदाची बातमी! पुन्हा एकदा हार्बर मार्गावरून लवकरच एसी लोकल धावणार आहेत. चेन्नईहून आलेली लोकल हार्बर मार्गावर सुरू होणार आहे.
रेल्वेने १४ फेऱ्या चालवण्याचे नियोजन रेल्वेने केले आहे. यात ७ अप आणि ७ डाउन फेऱ्यांचा समावेश आहे. पनवेल-सीएसएमटी, वाशी-वडाळा, वडाळा-पनवेल अशा मार्गांवर या फेऱ्या धावतील. प्रवाशांना आता आरामदायी आणि थंड प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.
हार्बर मार्गावर एसी लोकल सुरू झाल्याने प्रवाशांना अनेक फायदे मिळतील. उन्हाळ्यात थंड आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल. नियोजित १४ फेऱ्या (७ अप, ७ डाउन) मुळे पनवेल-सीएसएमटी, वाशी-वडाळा, वडाळा-पनवेल मार्गांवर गाड्यांची उपलब्धता वाढेल.एसी लोकलमुळे अधिक प्रवासी या मार्गाकडे आकर्षित होतील. नॉन-एसी लोकलवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल.असा अंदाज व्यक्त केला जात आहे.