
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील निसर्गरम्य ठिकाणांचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) अर्थात एसटीने खास उन्हाळी पर्यटन योजना सुरू केली आहे. यामध्ये महाबळेश्वर, कोकण किनारे, भीमाशंकर आणि राज्यातील अनेक निसर्गरम्य पर्यटनस्थळांसाठी नियमित बससेवा तसेच विशेष टूर पॅकेज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
याशिवाय, अष्टविनायक दर्शनसारख्या विशेष सेवांमुळे धार्मिक पर्यटनालाही प्रोत्साहन दिले जात आहे. यामुळे राज्यातील नागरिकांना रेल्वे आणि विमानाव्यतिरिक्त एसटीच्या साध्या आणि वातानुकूलित बसने स्वस्त आणि आरामदायी प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.
एसटीच्या उन्हाळी पर्यटन सुविधा
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पर्यटकांचा ओघ वाढत असताना एसटी महामंडळाने विविध पर्यटनस्थळांसाठी बससेवा आणि पॅकेज टूरची व्यवस्था केली आहे. पुणे विभागातील प्रमुख बसस्थानकांवरून (शिवाजीनगर, स्वारगेट, पिंपरी-चिंचवड) कोकण, गोवा, आणि थंड हवेच्या ठिकाणांसाठी नियमित बससेवा उपलब्ध आहेत. यामुळे पर्यटकांना कमी खर्चात आणि विश्वासार्ह प्रवासाचा पर्याय मिळत आहे. पुणे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील ठिकाणांसाठी बससेवा उपलब्ध आहे.
या प्रमुख पर्यटनस्थळावरुन बससेवा
कोकण: दापोली, रत्नागिरी, महाड, दिवेआगार, गणपतीपुळे.
थंड हवेची ठिकाणे: महाबळेश्वर, भीमाशंकर.
आंतरराज्य वाहतूक: गोवा (पणजी).
धार्मिक स्थळे: त्र्यंबकेश्वर, तुळजापूर, गाणगापूर, शेगाव.
अष्टविनायक दर्शन विशेष बससेवा
प्रत्येक चतुर्थीला अष्टविनायक दर्शन बससेवा सुरू करण्यात आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर आगार (वाकडेवाडी) येथून ही बस सकाळी 7:00 वाजता सुटेल आणि दोन दिवसांत अष्टविनायकांचे दर्शन घेतल्यानंतर परतेल. यासाठी प्रति प्रवासी 1,142 रुपयांचे टूर पॅकेज आहे. या सेवेला पुणेकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
पुण्यातील प्रमुख बससेवा आणि तपशील
पुणे (शिवाजीनगर) – गोवा (पणजी):
वेळ: सकाळी 4:30, 5:30, दुपारी 4:00, सायंकाळी 7:00, रात्री 8:30 वाजता.
प्रकार: निमआराम बस.
भाडे: 1,070 रुपये.
गोवा (पणजी) – पुणे:
वेळ: सकाळी 6:00, 7:30, 10:00, सायंकाळी 5:00, 6:00, रात्री 9:00 वाजता.
भाडे: 1,070 रुपये.
शिवाजीनगर – भीमाशंकर:
वेळ: पहाटे 4:30 पासून दुपारी 2:00 पर्यंत नियमित सेवा.
भाडे: 217 रुपये.
शिवाजीनगर – महाबळेश्वर:
वेळ: सकाळी 6:15, 7:45 आणि 9:30 वाजता
भाडे: 320 रुपये.
चिंचवड – दापोली (पिंपरी-चिंचवड आगार (वल्लभनगर))
वेळ: सकाळी 6:30, दुपारी 12:30 वाजता.
भाडे: 576 रुपये.
चिंचवड – शेगाव:
वेळ: रात्री 9:00 वाजता.
भाडे: 1,142 रुपये.
चिंचवड -गणपतीपुळे:
वेळ: सकाळी 8:00 वाजता.
भाडे: 599 रुपये.
चिंचवड – त्र्यंबकेश्वर:
वेळ: सकाळी 11:00, रात्री 11:00 वाजता.
भाडे: 418 रुपये.
स्वारगेट – तुळजापूर: (स्वारगेट आगार)
वेळ: पहाटे 4:45 पासून रात्री 10:00 पर्यंत दर तासाला.
भाडे: 755 रुपये.
स्वारगेट – गाणगापूर:
वेळ: सकाळी 8:30, 9:11, सायंकाळी 6:45 वाजता.
भाडे: 618 रुपये.
ऑनलाईन आणि ऑफलाइन बुकिंग सुविधा
कोणत्याही प्रवासावर जाण्यासाठी तुम्ही MSRTC Reservation App आणि msrtc.gov.in वर ऑनलाइन बुकिंग करू शकता, तसेच बसस्थानकांवर ऑफलाइन बुकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. साध्या आणि वातानुकूलित अशा दोन्ही बसचे पर्याय उपलब्ध आहेत. कोकण, गोवा, आणि थंड हवेच्या ठिकाणांसाठी नियमित बससेवा उपलब्ध असल्याने प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
स्वस्तात प्रवास
आगाऊ बुकिंग: MSRTC अँप किंवा वेबसाइटवरून तिकिटे आधीच बुक करा.
विशेष पॅकेज: अष्टविनायक दर्शन किंवा इतर टूर पॅकेज निवडा.
साध्या बसचा पर्याय: वातानुकूलित बसपेक्षा साध्या बसचे भाडे कमी आहे.
गटाने प्रवास: कुटुंब किंवा मित्रांसोबत प्रवास करून खर्च वाटून घ्या.
कशी कराल बुकिंग?
ऑनलाइन बुकिंगसाठी MSRTC Reservation App डाउनलोड करा किंवा msrtc.gov.in वर भेट द्या. येथे गंतव्यस्थान, तारीख, आणि बस प्रकार निवडून तिकीट बुक करा. तुम्ही ऑफलाइन तिकीट बूक करणार असाल तर जवळच्या बसस्थानकावर (शिवाजीनगर, स्वारगेट, पिंपरी-चिंचवड) तिकीट काउंटरवर संपर्क साधा. अधिक माहितीसाठी 1800-102-1030 (MSRTC हेल्पलाइन) वर कॉल करा. एसटी प्रशासनाने प्रवाशांनी ऑनलाइन बुकिंगचा वापर करावा असे आवाहन केले आहे.