
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रासाठी धक्कादायक बातमी हाती आली आहे. प्रसिद्ध मेंदू विकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केली आहे. वळसंगकर यांनी स्वतःच्याच डोक्यात गोळी झाडून आयुष्य संपवल आहे.
वळसंगकर यांच्या आत्महत्येने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी शुक्रवारी रात्री साडेआठच्या दरम्यान सात रस्ता परिसरातील सोनामाता शाळेच्या शेजारी असलेल्या बंगल्यात स्वत:वर गोळी झाडली. या घटनेला सदर बाजार पोलिसातील सूत्रांनी याला दुजारा दिला आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्येमुळे ते राहत असलेल्या परिसरात खळबळ उडालीये.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. वळसंगकर यांनी आपल्या निवासस्थानी रात्री साडेआठच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर त्याच अवस्थेत कुटुंबीयांनी तातडीने त्यांच्या स्वतःच्या रुग्णालयात दाखल केले. त्यांना मोदी स्मशानभूमी जवळील वळसंगकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
रुग्णालय परिसरात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली आहे. वळसंगकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉ. वळसंगकर यांनी स्वतःवर गोळी का झाडून घेतली याची अधिक माहिती पोलीस घेत आहेत.
डॉ. वळसंगकर यांनी सोलापुरातील डीबीएफ दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समध्ये शिक्षण घेतलं. त्या कॉलेजमध्ये त्यांनी सन्मानाने पदवी प्राप्त केली. त्यांनी विज्ञानाची पूर्व-पदवी उत्तीर्ण केली. प्री-प्रोफेशनल उत्तीर्ण केली. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण सोलापूर येथील डॉ. व्हीएम मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केलं.
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी शिवाजी विद्यापीठ, लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनमधून एमबीबीएस पूर्ण केलं. तसेच तिथूनच एमडी आणि एमआरसीपी पदवी मिळवली. त्यांना मराठी, कन्नड, इंग्रजी आणि हिंदी या भाषा अवगत होत्या.