
मुंबई प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिकेच्या ए विभाग दक्षिण विभाग कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना समर्पित संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने हा जयंती उत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर उपस्थित होते. यावेळी पालिका,उप आयुक्त प्रशांत सपकाळे, आदी मान्यवर आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते
या कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत भव्य आणि उत्साहात करण्यात आले होते. जयंतीनिमित्त सर्व अधिकारी, कर्मचारी व विविध विभागातील मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती.