
अंबरनाथ प्रतिनिधी
अंबरनाथ रेल्वे स्थानकाव धक्कादायक प्रकार घडला. लोकलमध्ये जागा मिळवण्यासाठी धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न करणारा प्रवासी प्लॅटफॉर्म आणि लोकलच्या गॅपमध्ये अडकला गेला होता. यानंतर त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र दुर्दैवाने त्याचा जीव वाचू शकला नाही आणि या अपघातात जखमी तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
रोहित बच्चेलाल यादव असं या 34 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. तो उल्हासनगरच्या लालचक्की भागातील शिवसैनिक बच्चेलाल यादव यांचा मुलगा. काही महिन्यांपूर्वीच तो अंबरनाथला राहायला आला होता. सकाळी कामावर जाण्यासाठी 7 वाजून 51 मिनिटांची लोकल पकडताना त्याचा अपघात झाला. यात जखमी झालेल्या रोहितला मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आलं होतं, परंतु उपचारादरम्यान त्याने जीव सोडला. या अपघातानंतर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.