
पुणे प्रतिनिधी
पुण्यातील राजगुरुनगर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजगुरुनगर येथील एका महाविद्यालयीन तरुणीचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात आढळला असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पिडित युवतीचा मृतदेह मांजरेवाडी येथे भिमा नदीच्या पात्रात आढळला असून सोबत असलेली बॅग बाजूच्या विहिरीत आढळून आली आहे. यातच आता या तरुणीच्या मृत्यूचं गूढ देखील उलगडलं आहे.
राजगुरुनगर येथून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन तरुणीची हत्या झाल्याचं तपासांत निष्पन्न झालं आहे. राजगुरुनगर येथे महाविद्यालयीन क्लासला आलेली तरुणी गावातील व्यक्तीसोबत दुचाकीवरुन गेल्याचं सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं आहे. पीडित अल्पवयीन तरुणीच्या डोक्यावर आणि तोंडावर गंभीर दुखापत करुन भिमानदी पात्रात फेकल्याची माहिती आता समोर आली आहे. लिफ्ट देणाऱ्या नराधमाने पीडित तरुणीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे पुणे पुन्हा हादरलं आहे.
लिप्ट देण्याच्या बहाण्याने तरुणाने पीडित तरुणीला दुचाकीवरुन घेऊन जाऊन हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. दुचाकीवरुन घेऊन जाणाऱ्या आरोपीनेच तरुणीची हत्या केल्याचं पोलिसांची माहिती दिली आहे. अल्पवयीन तरुणीच्या हत्येचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. मृतदेह शवच्छेदनासाठी पुण्यातील ससुन रुग्णालयात पाठविण्यात आलेला आहे.
नेमकं काय घडलं?
राजगुरुनगर येथील एका महाविद्यालयीन तरुणीचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात आढळला असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पिडित युवतीचा मृतदेह मांजरेवाडी येथे भिमा नदीच्या पात्रात आढळला असून सोबत असलेली बॅग बाजूच्या विहिरीत आढळून आली आहे.
‘कॉलेजच्या क्लासला चालले’ असं सांगून ती घरातून निघालेली होती, परंतु तरुणी परतली नाही. नातेवाइकांनी राजगुरुनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर तरुणीचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात आढळला. पीडित तरुणीचा खून झाल्याचं पोलिसांनी प्राथमिक अंदाच वर्तवला आहे.