
मुंबई प्रतिनिधी
तरुणांना एअरपोर्टस अँथोरिटी ऑफ इंडिया नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
एअरपोर्ट्स अॅथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) ने 2025 साली ‘ज्युनियर एक्झिक्युटिव्ह – एअर ट्रॅफिक कंट्रोल’ पदासाठी मोठ्या प्रमाणावर थेट भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये एकूण 309 पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक उमेदवार 25 एप्रिल 2025 ते 24 मे 2025 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकतात. भारतीय नागरिकांसाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे.
एकूण पदे-
रिक्त पदांची संख्या 309 आहे, त्यात 125 जागा खुल्या प्रवर्गासाठी, 72 OBC (इमाव) प्रवर्गासाठी, 55 SC (अजा) प्रवर्गासाठी, 27 ST (अज) प्रवर्गासाठी, 30 EWS प्रवर्गासाठी आणि 7 दिव्यांग कॅटेगरी-सी (AAV) साठी राखीव आहेत. उमेदवारांना या पदांसाठी B.Sc. (Physics आणि Mathematics) किंवा कोणत्याही शाखेतील इंजिनीअरिंग पदवी असावी लागेल. पदवीत Physics आणि Mathematics या दोन विषयांचा अभ्यास असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा आणि अर्जशुल्क
या भरतीसाठी वयोमर्यादेचे नियम आहेत. 24 मे 2025 रोजी उमेदवारांची वयोमर्यादा 27 वर्षे असावी लागेल. इमाव (OBC) प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची सूट दिली जाईल, SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षांची सूट मिळेल, तर दिव्यांग उमेदवारांना 10 वर्षांची सूट मिळेल.